• आदिवासींचे शिक्षण व आरोग्य

    आदिवासींचे शिक्षण व आरोग्य

    भारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्‍यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.

    Aadivasinche Shikshan V Aarogya

    Rs.250.00
    Add to cart
  • आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास

    आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास

    ‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

    इंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.

    Awas Yojana Aani Anusuchit Jati v Jamatincha Vikas

    Rs.250.00
    Add to cart