• Fundamentals of Rural Society

    India is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.
    In This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.
    But the research articles received and the discussion on these topics was abundant and hence it was not possible to publish it in one and the same book. So this book covers only Fundamentals topcis.
    We hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.

    450.00
    Add to cart
  • Research Methodology

    395.00
    Add to cart
  • Rural Industrialisation in India

    Society can flourish when all sections of populace, sectors of economy and different regions can draw benefits to prosper and progress. Despite India becoming a major power in terms of reasonably high growth rate, it is the home of the largest number of poor. There is a paradoxical situation that benefits of growth have not percolated to all regions and segments of population. Incidence of poverty on account of deprivation in many areas, in terms of socio-economic infrastructure is more evident in rural India. The book centers around this core theme hence takes up the case for rural folks living in countryside. The book covers suggestions based on appraisal to make rural industrialisation more pragmatic and practical in the present context of globalisation. It helps readers in better assimilation on the subject.

    195.00
    Add to cart
  • Rural Society and Development

    India is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.
    In This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.
    But the research articles received and the discussion on these topics was abundant and hence it was not possible to publish it in one and the same book. So this book covers only Fundamentals topcis.
    We hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.

    450.00
    Add to cart
  • Rural Society Past, Present and Future

    India is a country of villages. Gandhiji said that if you want to see the real nature of india, visit the villages. Now days the nature of rural society is changing but it is also a fact that the people of rural society have to face many problems. And hence it is necessary to study the problems and the remedies to overcome the problems. After independence Indian Governments, started various schemes including Three Tier System as well as some individuals and also NGO’s have started some work for rural development. But yet, the efforts are not up to the mark to overcome the problems. Hence, it is necessary to discuss on the existing situtation of the rural society. With considering this situtation we have planned to organize the international conference.
    In This conference the discussion has been done on various fundamental topics such as Rural Traditions, Rural Education, Rural Literature and developmental topics such as Role of governments, NGO’s and the Three Tier System etc.
    We hope that the research articles and the discussion will be helpful to the scholars, planners, social workers and the persons who are working in govt. schemes as well as in NGO’s for the development of rural society.

    450.00
    Add to cart
  • आदिवासी तडवी भील

    जगातील तसेच भारतातील पहिली सभ्यता म्हणुन आदिवासी भिल्लांचा उल्लेख करावा लागेल. तडवी हे भिल्लांचे वंशज आहेत. आदिवासी तडवींची मातृभाषा ही ‌‘तडवी’ म्हणुन ओळखली जाते. आदिवासी बोलीभाषा या मुक्त, नैसर्गिक स्वभाव गुणसंपन्न असतात. त्यांच्यात एक प्रकारची सहजता दिसते. आदिवासी तडवी भाषा ही नैसर्गिकपणे ध्वनी, उच्चार, गोडवा, सहजता, ताल, लय, माधुरता या गुणांमुळे हजारो वर्षांपासून फक्त मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत व सहजच चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ती लोप पावली नाही. आदिवासी जमातीच्या रूढी, परंपरा, चालीरिती, चालचलन, जीवन व्यवहार, रीतीरिवाज, खानपान, सांस्कृतिक, सामाजिक, जीवन पद्धती, वाङ्मय, लोककथा, साहित्य संपदा या बाबी मौखिक स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत होत आलेल्या आहेत. तडवी लिपीच्या वापराने अख्खी विश्वजात, विश्वसाहित्य, विश्वलोकवाङ्मय व विश्वलोकाभिमुखता सामावून घेण्याची ताकद निश्चितच आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.

    Aadivasi Tadvi Bhil : Tadvi Bhasha Aani Tadvi Lipi

    195.00
    Add to cart
  • आदिवासी तडवी भील : रुढी, परंपरा, चालिरिती

    आदिवासी तडवी भिल्ल ही एक भिल्ल आदिम जमात आहे. तडवी ही एक शूर, युद्धात भाग घेणारे योद्धे म्हणूनही ही जमात ओळखली जाते. इ.स.पू. 300 ते 4000 पाषण युगापासून आदिवासीचे पुरावे हे संशोधकांना मिळाले आहेत. “भिल्ल” संस्कृती ही जगातील पहिली सभ्यता असावी असे काही जगातील संशोधकांचे मत आहे. आदिवासी तडवी हे हिंदू-मुस्लिम नाहीत. त्याची आपली संस्कृती आहे. स्वतंत्र अशी ‘तडवी’ भाषा आहे तसेच स्वतःची अशी संस्कृतीची गुप्त भाषा आहे. मुस्लिम हिंदू संस्कृती प्रमाणे कोणतेही साम्य आढळून येत नाही. पोशाख, पेहराव, खानपान, सामाजिक रीतिरिवाज, चालीरिती, रूढी परंपरा हे स्वतंत्र व अत्यंत भिन्न आहेत. गेल्या हजारो शतकानुशतके अशी आदिवासी संस्कृती, तडवी संस्कृती आपले आचरण, पालन करतांना दिसतात. आदिवासी हे निसर्ग व पूर्वजांना पूजतात.
    आदिवासी संस्कृती व आदिवासी तडवी भील संस्कृतीचा शोध या पुस्तकात घेतला आहे. आजच्या 21 व्या शतकातील पिढीला हे सर्व ज्ञात व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!

    Adiwasi Tadvi Bhill : Rudhi, Parampara, Chaliriti

    225.00
    Add to cart
  • आदिवासी शिक्षणातील शासकीय योजना

    21 व्या शतकातही आदिवासी समाज हा अज्ञान, अंधश्रध्दा व दारिद्रयाने बऱ्याच प्रमाणात ग्रासलेला आहे. अज्ञान व गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित असून मागासलेला आहे. आदिवासी समाज अतीदुर्गम भागात, डोंगरदऱ्यात राहणारा व शहरी जीवनापासून वेगळा राहणारा, स्वत:ची वेगळी अशी संस्कृती टिकविणारा समाज आहे. औद्योगिकीकरण व दळणवळणाच्या साधनांमुळे तसेच शहरी समाजाच्या सानिध्यात आल्यामुळे आदिवासी काही प्रमाणात आपली करु शकला. तसेच सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे याकरीता स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर अनेक समाजसुधारकांनी विविधांगी प्रयत्न केले. आदिवासी समाजाने राष्ट्राच्या आर्थिक विकासातील शिक्षणाचे महत्व ओळखले. सद्य:स्थितीत आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता सरकारी व खासगी संस्थांच्या माध्यमातुन विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. आदिवासींच्या शिक्षणाकरीता विविध प्रयत्न होत असूनही त्यांची शिक्षणाची प्रगती इतर समाजाच्या तुलनेत फारच अल्प असल्याचे निराशाजनक चित्र आजही दिसते.

    Aadiwasi Shikshanatil Shaskiyta Yojana

    150.00
    Add to cart
  • आदिवासी समाज

    Adivasi Samaj

    395.00
    Add to cart
  • आदिवासींची शैक्षणिक स्थिती

    समाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्‍या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्‍या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.

    Aadivasinchi Shaikshanik Sthiti

    125.00
    Add to cart
  • आदिवासींचे शिक्षण व आरोग्य

    भारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्‍यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.

    Aadivasinche Shikshan V Aarogya

    250.00
    Add to cart
  • आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास

    ‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

    इंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.

    Awas Yojana Aani Anusuchit Jati v Jamatincha Vikas

    250.00
    Add to cart
  • ग्रामीण विकास

    Gramin Vikas

    180.00
    Add to cart
  • ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या

    भारतातील जवळपास 70% जनता ही आजही खेड्यात वास्तव्यास आहे. या ग्रामीण भागातच भारताची खरी संस्कृती जपण्याचे कार्य केले जाते. त्यात समाजाच्या परंपरा, शिक्षण, साहित्य, चालीरिती यांचा समावेश होतो.
    ग्रामीण समाजाच्या ‘काल’ या घटकात प्राचीन काळातील परंपरा व शिक्षणपद्धती यांचा समावेश केला आहे. समाजाचे दुःख, वेदना, त्यांच्या परंपरा यांचे लिखीत प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात दिसून येते. त्यामुळे ग्रामीण साहित्यात त्या काळातील स्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो.

    ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणजे शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच ग्रामीण जनतेचा निर्णय प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी अस्त्त्विात आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था, बिगगर सहकारी संस्थांचा सहभाग व भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या घटकांवरच ग्रामीण समाजाचे भविष्य अवलंबून आहे. एकंदरीत ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण अभ्यासाच्या दृष्टीने वरील सर्व घटकांचा कालानुरुप समावेश या पुस्तकात केला आहे.

    Gramin Samaj : Kal, Aaj Ani Udya

    495.00
    Add to cart
  • ग्रामीण समाज व विकास

    मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाला स्वतःच्या विकासासाठी समाजावरच अवलंबून रहावे लागते. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचाही निर्णय प्रक्रियेत समावेश केला आहे. वैदिक काळापासून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष ग्रामविकासात सहभाग असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी मांडली. त्यातूनच पुढे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली.

    ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर सरकारी संस्था, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना मोलाच्या ठरल्या आहेत. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील ग्रामीण जनतेच्या विकासात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा यासाठी पंचायतराज, बिगर सरकारी संस्था, विविध शासकीय योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

    Gramin Samaj V Vikas

    475.00
    Add to cart
  • ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे

    प्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्‍या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

    Gramin Samajachi Multatve

    475.00
    Add to cart
  • पंढरीनाथ पाटील – राजकीय व सामाजिक कार्य

    भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी नि:स्वार्थीवृत्तीने सहभाग घेवून लाठीमार, तुरुंगवास, गोळीबार सहन केलेला आहे. हे कार्य करत असतांना त्यांनी कुटूंबाचा, नातेवाईकांचा कोणताही विचार न करता स्वातंत्र्य मिळविणे हेच आपले ध्येय असल्याचे सिद्ध करुन दाखविले. अशा सामान्य लोकांसाठी ‘स्वातंत्र्य लढयाचे पाईक’ असा शब्द प्रयोग वापरणे योग्य ठरेल. असे पाईक खेडयांपासून ते शहरीभागांपर्यंत निर्माण झालेले होते. त्याचाच एक भाग म्हणजे बुलडाणा जिल्हयात कार्यरत असणारे पंढरीनाथ पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. घरातील आर्थिक अडचणींवर मात करुन घेतलेले शिक्षण हे त्यांना पुढील काळात अत्यंत उपयोगी ठरल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ पाटील यांनी गांधी कालखंडातील असहकार, सविनय कायदेभंग व भारत छोडो हया तिन्ही आंदोलनात केलेल्या कार्यावर लेखकांनी दूर्मिळ माहिती उजेडात आणलेली आहे. पंढरीनाथ पाटीलांनी बेळगाव, चिखली, जस्तगाव, कल्याण, वर्धा, पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणच्या परिषदांमध्ये मांडलेल्या विचारांचा आवर्जून हया संदर्भ ग्रंथात उल्लेख केलेला आहे. त्यावरुन पंढरीनाथ पाटील हे बौद्धिकतेची कास धरणारे व्यक्तीमत्व होते असे निश्चित सांगण्यात येते.

    पंढरीनाथ पाटील हे स्वातंत्र्य आंदोलनाचे पाईक तर होतेच पण त्याच बरोबर सामाजिक जागृतीलाही प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व होते. विधवा पुर्नविवाह व अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी लागेल. स्वत:च्या पुढाकाराने त्यांनी दोन बालविधवा मुलींचा पुर्नविवाह घडवून आणला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसमवेत अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. याशिवाय अंबादेवी मंदिर खुले, वर्‍हाड प्रांतीय अस्पृश्य महार परिषद, तुरुंगात अस्पृश्यांवर होणारा सामाजिक अन्याय, अस्पृश्यता निवारण मंडळाद्वारे कलेले कार्य विस्तृत स्वरुपात मांडलेले आहे. पंढरीनाथ पाटील हयांचे अस्पृश्य समाजातील अनेक मित्र असल्याचे नावानूसार उल्लेख दिल्याने भर पडली आहे. थोडक्यात विदर्भात अस्पृश्य निवारण्यासंदर्भातील एक कृतिशील समाजसुधारक म्हणून पंढरीनाथ पाटीलांचा उल्लेख करावा लागेल.

    Pandharinath Patil – Rajkiya & Samajik Karya

    350.00
    Add to cart
  • पश्चिम खान्देशातील आदिवासी लोक साहित्य

    ‘पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य’ हा ग्रंथ म्हणजे आदिवासींचे लोकजीवन, लोकसाहित्य, संस्कृती, रुढी, परंपरा इत्यादीची ओळख करुन देणारा आहे. आदिवासी जमातीच्या 47 जमाती आहेत. या जमातीपैकी वारली, कोकणा, ठाकर, गोंड, पारधी, प्रधान अशा बर्‍याचशा जमाती पुढे आलेल्या आहेत. म्हणजे शहरी जीवनाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. जगाची त्यांची ओळख झालेली दिसते. त्यांनी साहित्यामध्येपण आपले स्थान निश्चित केलेले आहे. त्यापैकी भिल्ल ही आदिवासी जमात. पावरा, कोकणा या जमाती पश्चिम खानदेशातील आहेत. त्यासुध्दा आता तसा प्रयत्न करीत आहे. आपआपल्या समाजाजवळ परंपरागत मौखिक भरपूर लोकसाहित्य आहे, व तो आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. तो जतन करण्याच्या उद्देशाने काही अभ्यासक अभ्यासूवृत्तीने त्या साहित्याकडे जाणिवपूर्वक पाहून ते जतन करत आहेत. त्यापैकीच प्रा. डॉ. पुष्पा गावीत यांनी पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य या विषयाचे संशोधन करुन या साहित्याला समाजाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये आदिवासींच्या संपूर्ण लोकजीवनाचा अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. पहिल्या प्रकरणामध्ये भिल्लांचे लोकजीवन यामध्ये त्यांनी विवाहपध्दतींचा सविस्तरपणे असा परिचय आपणास दिला आहे. सर्व जमातींचा आपण आदिवासी जमाती म्हणून उल्लेख जरी करत असलो तरी प्रत्येक जमातीची संस्कृती, रुढी, परंपरा, त्यांचे देवदैवत, आचार, विचार हे आपणास भिन्न भिन्न प्रकारचे दिसून येतात.

    Pahschim Khandes Adivasi Lok Sahitya

    250.00
    Add to cart
  • प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान

    बोली आणि भाषा या देशाची विरासत आहे. भाषा हे समाजव्यवहाराचे महत्त्वाचे साधन आणि सामाजिक संस्था असल्याने बोली समाजव्यवहारात घट्ट रुतून बसल्या आहेत. मानव जातीच्या प्रगतीचा इतिहास बोलींमध्ये दडून बसला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांनीही बोलींचे महत्त्व ओळखून ‘बोली या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत’ असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले होते, आणि 11 जानेवारी 1965 ला ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा झाल्यानंतर, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही माधव ज्युलियनांची भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठी राजकीय पातळीवरही पाऊले उचलली गेली होती. ज्या मराठी भाषेला वैभवाच्या शिरावर बसविण्याची शपथ घेतली होती, त्या मराठी राजभाषेची आणि तिला समृद्ध करणार्‍या तिच्या दीडशेहून अधिक बोलींची काय अवस्था आहे हे ही समजून घेतले पाहिजे. मराठीला 52 बोली आहेत असा दावा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करणार्‍या समितीने केला आहे. प्रत्यक्षात मराठीला 150 हून अधिक बोली आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणार्‍या तिच्या बोली नष्ट झाल्या तर त्या बोलीतील शब्दांचे अर्थ आणि भावना नष्ट होतील. मराठी भाषा विविध अर्थ आणि भावनांविना लुळीपांगळी होऊन परकीय भाषा तिच्यावर आक्रमण करेल. आज महाराष्ट्रात मराठीवरील इंग्रजीचे आक्रमण वाढते आहे. ते रोखण्यासाठी, मराठीला अधिक समृद्ध करून ती जगाची ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्या बोलींना जपणे व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ‘प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान’ हा महाराष्ट्रातील सत्तावीस प्रादेशिक बोलींचे भाषिक सौंदर्य, बोलींचे समाजशास्त्र, बोलीविज्ञान व व्याकरण व्यवस्था जपणारा आणि संवर्धन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

    Pradeshik Bolinche Bhashavidnyan

    575.00
    Add to cart
  • प्रारंभिक समाजशास्त्र

    Praranbhik Samajshastra

    110.00
    Add to cart
  • बालकामगार समस्या व समाधान

    डॉ. आर. के. शेख विदर्भातील प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे गेल्या पाच वर्षापासून पदव्यूत्तर अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणुन अध्यापनाचे कार्य करित आहेत. याआधि त्यांनी या संस्थेअंतर्गत डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे 28 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अध्यापनाचा एकूण अनुभव 33 वर्षाचा आहे. संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च आचार्य पदवी (पीएच.डी.) बालकामगारासारख्या ज्वलंत विषयावर 2007 मध्ये संपादित केली आहे. त्यांच्या आचार्य पदवी संशोधनाचा विषय, ‘अकोला जिल्ह्यातील लघुउद्योगात काम करणार्‍या बालकामगारांच्या समस्या व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण’ हा होता. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थ्यांनी संशोधन प्रबंध विद्यापिठाला सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून आतापर्यंत त्यांचे विविध परिषदांमधून 35 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रे व नियतकालीकांमधून त्यांचे विविध आर्थिक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. एक अभ्यासू, विद्यार्थाप्रिय प्राध्यापक म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत.

    Balkamagar Samasya V Samadhan

    275.00
    Add to cart
  • भारतीय समाज : प्रश्न आणि समस्या

    Bharatiya Samaj : Prashn Ani Samasya

    185.00
    Add to cart
  • भारतीय समाज संरचना व बदल

    Bharatiya Samaj Sanrchna V Badal

    280.00
    Add to cart
  • भारतीय सामाजिक समस्या

    मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.

    मात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.

    सदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

    Bhartiy Samajik Samasya

    375.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील चळवळी

    ‘चळवळ’ हा शब्द विशिष्ट विचारधारेवर आधारित व कृतींशी संबंधित आहे. ही कृती परिवर्तनवादी असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेने नवीन विचारधारा स्वीकारली म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारत्मक कृती परिहार्य ठरते. नव्या विचारांचे महत्व लक्षात आल्यावर ते विचार अंगिकारणारे ‘अनुयायी’ निर्माण होतात. त्या सर्वांच्या सामुहिक कृतीतून साकारते ती ‘चळवळ’! ती उद्दिष्टांवर आधारीत असते. समाजमन ती स्वीकारते व कालांतराने ती विचारधारा स्थिरावते. त्यालाच त्या कृतीशी संबंधित चळवळ उठाव हा ब्रिटीश व सावकारशाही विरोधात झाल्याचे दिसून येते. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर उद्योगधंद्यातून भांडवलदारांना मुबलक प्रमाणात नफा मिळू लागला. मात्र त्या नफ्याच्या तुलनेत कामगारांना मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि कामगार वर्ग संघटीत होवू लागला. या संघटनात्मक बदलातून कामगार चळवळीचा उदय झाला. ब्रिटीश अधिकारी व भारतीय सावकार यांनी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली व त्यातून आदिवासी पेटून ठरलेत. त्याचे पडसार आदिवासी चळवळीच्या माध्यमातून उमटले.

    Maharashtratil Chalwali

    495.00
    Add to cart
  • महिला आणि मानवी हक्क

    आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

    भारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्‍या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.

    Mahila Ani Manvi Hakk

    425.00
    Add to cart
  • मानवाधिकार आणि मूल्यशिक्षण

    Manvadhikar Aani Mulyashikshan

    475.00
    Add to cart
  • मानवी हक्क

    मानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक, मानवाच्या नैसर्गिक अस्तित्वाशी संबंधित अशा सर्व अधिकारांना मानवाधिकार म्हणतात. प्रत्येकात आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपले व्यक्तिगत गुण, बुद्धिमत्ता व स्वत्त्व भावनेची जपणूक करण्यासाठी मानवाधिकाराची आवश्यकता असते. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. तसेच मानवी हक्कांना नैतिक हक्क. तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.

    या ग्रंथात मानवाधिकार, बालविकास, महिला विकास, तरुणवर्गाचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, अपंग कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण मूल्ये आणि नैतिकता इ. प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

    Manavi Hakka

    695.00
    Add to cart
  • मानवी हक्क

    Manavi Hakka

    150.00
    Add to cart
  • मानवी हक्क : सद्यस्थिती आणि आव्हाने

    मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करुन घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जेा परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास द्धि असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसर्‍याच्या शिकवणीने वागत नाही, कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरुन जात नाही, दुसर्‍याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.

    – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    Manvi Hakk Sadhasthiti ani Avahane

    595.00
    Add to cart
  • मानवी हक्क आणि मूल्यांचे अध्यापन

    अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार केला. मानवाधिकार ही संकल्पना फारच विस्तृत आणि व्यापक आहे. ही संकल्पना मुख्यत्वेकरुन विश्वबंधुत्वाच्या भावनेशी निगडीत आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाशी मानव अधिकारांचा घनिष्ठ संबंध असतो. सदरील पुस्तकात मानवी हक्काची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्क आणि बालक, मानवी हक्क आणि महिला, अल्पसंख्यांक व मानवी हक्क, अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क, मानवी हक्कांसाठी शिक्षकाची भूमिका, मानवी हक्क व मूल्यांचे अध्यापनासाठी शिक्षण, मानवी हक्कांचे उल्लंघन अशा महत्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

    अल्पसंख्यांकांचे प्रश्न, सांप्रदायिकता, दहशतवाद, नक्षलवाद, निराश्रितांचे प्रश्न, दारिद्य्र, बेकारी, कुपोषण, एड्स आणि पर्यावरणाचा र्‍हास अशी मानवी हक्क उल्लंघनाची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी हक्कांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालयांमधूनच गांभीर्याने शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठीच सदरील पुस्तकाचे लेखन प्रयोजन.

    Manvi Hakka Aani Mulyanche Adhyapan

    150.00
    Add to cart
  • मानवी हक्क सिद्धांत आणि व्यवहार

    मानवी हक्क ही आधूनिक संकल्पना आहे. मानवी हक्काच्या संकल्पनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होण्यास बराच कालावधी लागला. मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीयकरणास खर्‍या अर्थाने दुसर्‍या जागतिक महायुध्दानंतर वेग आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर खर्‍या अर्थाने हक्कांच्या आतंरराष्ट्रीय बील ऑफ राईटचा विकास झाला. राष्ट्राराष्ट्रामध्ये मानवी हक्काचा अर्थ आणि आशय यासंबंधी एक मत नव्हते. मुलभुत मानवी हक्काचे सैध्दांतीकीकरण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नव्हते. प्रत्येक राष्ट्राची मानवी हक्काबाबत स्वत:ची चौकट होती. सर्व प्रथम संयूक्त राष्ट्रसंघाने हक्कांच्या सैध्दांतीकीकरणाला सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद हा मानवी हक्कांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सैध्दांतीक स्वरुप देण्याच्या प्रक्रियेचा पाया आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेत मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिंसेबर 1948 रोजी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा घोषित केला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांची सर्व समावेशक यादी तयार करुन मानवी हक्कांना संहीताबध्द करण्यात आले त्यामुळे मानवी हक्कांच्या संरक्षणाची गरज आणि भावना वैश्विक बनली. मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्याने मानवी हक्कांचे सैध्दांतीक संहितीकरण, मानवी हक्कांना राष्ट्राची अधिमान्यता या गोष्टी साध्य झाल्या. दुसर्‍या महायुध्दानंतर स्वतंत्र्य झालेल्या देशाच्या राज्यघटनामध्ये मानवी हक्कांना प्राधान्य देण्यात आले मानवी हक्कांची राज्यघटनेत नोंद करतांना या जाहिरनाम्याचा मोठया प्रमाणात प्रभाव पडला आहे.
    आज अनेक देशांच्या राज्यघटनांमध्ये मानवी हक्कांचा समावेश करुन त्यांचे सैध्दांतीेकीकरण करण्यात आले आहे. परंतु मानवी हक्कांचे सैध्दांतीक स्वरुप आणि प्रत्यक्ष व्यवहारात मानवी हक्कांच्या अंमलबजावणी साठी आवश्यक वातवरण यामध्ये बरेच अंतर असल्याचे निर्देशित होते. भारतासारख्या देशामध्ये मानवी हक्कभंग ही नित्याची गोष्ट आहे. भारतीय जनता अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी, शिक्षण अशा मुलभुत गरजासाठी अजूनही झगडते आहे. आज मुलभुत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी केल्या जाणार्‍या उपाययोजना अपूर्‍याच आहेत. आपण स्वातंत्र्यानंतर खुप प्रगती केली असली तरीही आपल्या जागतिक महासत्ता बनू पाहणार्‍या देशात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवित आहेत. यातून सामान्य माणसाचा जगण्याचा मानवी हक्कच धोक्यात आला असल्याचे वास्तत्व आपल्या समोर आहे. मोठया प्रमाणात असलेल्या तरुण हातांना काम मिळत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. शिक्षणाचा हक्क मुलभुत हक्क म्हणून मान्य करण्यात आला असला तरी सामान्य माणसाला शिक्षण परवडेल अशी स्थिती राहिली नाही. सैध्दांतिकद़ृष्टया मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भरीव तरतुदी असल्यातरी वास्तव मात्र त्यांच्या उलट आहे. धर्माच्या नावाखाली होणार्‍या अतिरेकी हल्यामुळे मानवी हक्कांवर गंभीर अतिक्रमण होत आहे. मानवी हक्क सिध्दांत आणि व्यवहार यांची शहानिशा करतांनाचा सैध्दांतीकद़ृष्टया मानवी हक्क कितीही सक्षम असले तरीही वास्तविक मानवी हक्क अमलबजावणीचे चित्र फारसे आशादायक नाही. मानवी हक्क सिंध्दात आणि व्यवहार यांच्यात विषम स्थिती निर्माण होण्याला मानवी हक्काबदल समाजात असलेल्या जागृतीचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे. मानवी हक्कांबाबत जागृत असलेला समाजच आपल्या हक्कांच्या अमंलबाजावणीसाठी सरकारकडे आग्रह धरु शकतो. जनता आणि शासन मानवी हक्काबाबत सतर्क आणि सक्रीय असेल तरच मानवी हक्कांना अर्थ आहे.

    Manvi Hakka Prakriya Ani Siddhant

     

    Manvi Hakk Sidhanta ani Vyavhar 

    495.00
    Add to cart
  • मूलभूत समाजशास्त्रीय विचार

    मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.

    Mulbhut Samajshashriy Vichar

    325.00
    Add to cart