-
महाराष्ट्रातील चळवळी
Rs.495.00‘चळवळ’ हा शब्द विशिष्ट विचारधारेवर आधारित व कृतींशी संबंधित आहे. ही कृती परिवर्तनवादी असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेने नवीन विचारधारा स्वीकारली म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारत्मक कृती परिहार्य ठरते. नव्या विचारांचे महत्व लक्षात आल्यावर ते विचार अंगिकारणारे ‘अनुयायी’ निर्माण होतात. त्या सर्वांच्या सामुहिक कृतीतून साकारते ती ‘चळवळ’! ती उद्दिष्टांवर आधारीत असते. समाजमन ती स्वीकारते व कालांतराने ती विचारधारा स्थिरावते. त्यालाच त्या कृतीशी संबंधित चळवळ उठाव हा ब्रिटीश व सावकारशाही विरोधात झाल्याचे दिसून येते. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर उद्योगधंद्यातून भांडवलदारांना मुबलक प्रमाणात नफा मिळू लागला. मात्र त्या नफ्याच्या तुलनेत कामगारांना मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि कामगार वर्ग संघटीत होवू लागला. या संघटनात्मक बदलातून कामगार चळवळीचा उदय झाला. ब्रिटीश अधिकारी व भारतीय सावकार यांनी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली व त्यातून आदिवासी पेटून ठरलेत. त्याचे पडसार आदिवासी चळवळीच्या माध्यमातून उमटले.
Maharashtratil Chalwali
-
महिला आणि मानवी हक्क
Rs.425.00आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.
भारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.
Mahila Ani Manvi Hakk