रोग अनेक उपचार एक – शिवांबु
प्राचीन काळापासून आपले ऋषिमुनी, हठयोगी, तपस्वी नित्य शिवांबु प्राशन करून निरोगी शरीराची जोपासना करीत आहे, पण त्यांनी हे गुप्तपणे केले. भारतीय ग्रंथावलीत शिवांबु विषयी माहिती दिलेली आहे. शास्त्रीय अभ्यासातून, विश्लेषणातून हे सिद्ध झाले आहे की, शिवांबु वृद्धावस्था आणि रोगांचा नाश करणारे दिव्य अमृत आहे.
आपल्या देहात जर काही बिघाड झाला तर तो दुरूस्त करण्याचे औषध आपल्याच देहात किंबहुना प्रत्येक प्राणी मात्राच्या देहात निसर्गातः निर्माण केलेले आहे. पण अज्ञानामुळे आपण त्याच्या लाभापासून वंचित आहोत. ज्याच्या प्राशनाने शरीरात रोग निर्मितीच होणार नाही ते शिवांबु मानवासाठी वरदानच आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शिवांबु उपचारासाठी एक पैसा ही लागत नाही. स्वमुत्र हा रक्ताचाच एक भाग आहे. जे घटक मानवी रक्तात असतात तेच घटक शिवांबुमध्ये असतात कारण मानवी शरीरातुन अतिरिक्त बाहेर टाकलेले रक्त म्हणजेच शिवांबु होय! वैज्ञानिकांच्या मते, शिवांबुमध्ये बायो तत्व आढळतात जे आरोग्यदायक असतात. आणि शरीर निरोगी बनवतात. अनियमित आहार, अपथ्य हेच कुठल्याही रोगाचे मुळ कारण असते. यामुळे पचनशक्ती मंदावते व मलविसर्जन पुर्णपणे न होऊन मलसंचय होतो. स्वमुत्राने यावर परिणाम होऊन पाचनशक्ती वाढते व मलविसर्जन नियमित होते. त्यामुळे रोग निर्मितीला आळा बसतो.
डायबिटीस, हृदयरोग, संधीवात, अल्सर, अपचन, दमा, फुफ्फुसाचे विकार, त्वचा रोग, दंतरोग, मुखरोग, वातरोग, वातरोग, हाडांचे आजार, जुनाट सर्दी-पडसे, किडनी, यकृताचे आजार, मेंदूरोग, टि.बी., मुळव्याध, मिर्गी, नेत्ररोग घशाचे आजार मलेरीया, टायफाईड, चिकन गुनिया, अस्थिरोग, गुडघेदुखी, डोकेदुखी, अर्धशिशी, रक्तदाब, या व अशा अनेक व्याधींवर शिवांबु उपचाराने मात करता येते.
Shivambu Pivale Ratka