भारतवर्ष खंड 1 – अश्मयुग ते इसवी 1206
* प्राचीन भारतीय इतिहास *
‘भारतवर्ष’, ‘आर्यवर्त’, ‘इंडिया’, ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘जम्बुद्विप’ इ. विविध नावांनी आपला देश ओळखला जातो. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना आपण कोण? मानवाचा विकास आणि त्या विकासाच्या अवस्था, भारतातील मानवाच्या सहा वांशिक प्रजाती आणि चार भाषीक समुह यांची नोंद लेखकाने घेतली आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या अभ्यासाची साहित्यीक आणि पुरातत्वीय आणि विदेशी यात्रेकरूंचे वृत्तांत साधन म्हणून नोंदविले आहेत. भारतातील प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहासकाळ आणि ऐतिहासिक काळ यांचा वृत्तांत समर्पक शब्दात मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संस्कृती सिंधु संस्कृतीची नोंद विविध अंगाने शब्दबद्ध केली आहे. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक संस्कृतिची वैशिष्ट्ये, इ.पू. 6 व्या शतकातील जैन आणि बौद्ध धर्म पंथांचा उदय आणि घडलेली प्रबोधनाची चळवळ वाचनीय आहे. संगम साहित्यात लेखक-कवि-रचनाकारांचे योगदान, प्राचीन भारतातील पहिले केंद्रीय साम्राज्य मौर्य सत्ताचा उदय-विस्तार आणि अस्त यांची माहिती एकत्रित वाचकाला मिळते. मौर्योत्तर काळात झालेले बदल गुप्त काळात निर्माण स्थैर्य आणि विकास, कला-साहित्य-स्थापत्य-निर्मिती वैभवशाली राहिली. गुप्तोत्तरकाळात प्रांतीय सत्तांचा झालेला उदय, दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात झालेले त्रिपक्षीय संघर्ष तसेच पूर्व व आग्नेय आशियाच्या भागात भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार आणि प्रचार याची नोंदही जाणीवपूर्वक लेखकाने सिद्धहस्तपणे घेतली आहे. परिशिष्ठात लेखकाने प्राचीन भारतीय सामंतशाही, चित्र आणि मूर्तीकला, विद्याकेंद्रे, संस्कारांची यादी, लिपी, महत्त्वपूर्ण विधाने, राज्य आणि राजधानी, राजवंश, शहरे, शब्दार्थ, घटनाक्रम इ. ची नोंद केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 2 – इसवी 1206 ते 1818
* मध्ययुगीन भारतीय इतिहास *
रवींद्रनाथ टागोर ‘भारतवर्ष’ ही एक संपूर्ण भौगोलिक मूर्ती आहे असे मानतात. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना इ.स. 1206-1818 या 612 वर्षाच्या कालखंडाची मांडणी लेखकाने इस्लाम धर्माचा उदय आणि तुर्क आक्रमणे नोंदवून केली आहे. सुलतानशाही आणि मोगल सत्ता यांनी मध्ययुगीन कालखंडात भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृति, प्रशासन, आहारविहार यांना नवीन आयाम दिले. मध्यकाळात सुफी आणि भक्तिचळवळीच्या झालेल्या उदयाने संस्कृति समन्वयच नव्हे तर भारतवर्षाच्या सर्व धर्म, पंथ, जात, व्यवहार यांना एकसंघत्वाच्या विचाराने पूढे जाण्याचा मार्ग दाखविला. मध्ययुगीन कालखंडात दिल्ली-मध्य भारत हे सत्तेचे केंद्र राहिले. अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिणेतील आक्रमण आणि मुहम्मद तुघलकाद्वारा देवगिरी हे बनलेले राजधानी केंद्र या दोन घटकांतूनच दक्षिणेच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा झालेला उदय याचीच परिनीति आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरिदशाही आणि ईमादशाही यांच्या परस्परांच्या संघर्षात मराठा सरदारांचा-घराण्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. नव्हे तर या सत्ता म्हणजेच मराठा सरदार आणि घराण्यांचे कार्य आणि कर्तृत्व होय. मुघलांच्या सत्तांचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा समकालीन काळ होता. याच काळात पाश्चिमात्यांचे भारतात आगमन झाले. मराठा सत्तेचा शेवट केल्यानंतर ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळातील शब्दांचे अर्थ परिशिष्ठात दिले आहेत. सचित्र मांडणी, बल्बन, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज तुघलक, शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या काळातील लेखकाने नोंदविलेल्या सुधारणा आणि योग्य ठिकाणी केलेली तुलनात्मक मांडणी हे ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 3 – इसवी 1818 ते 2000
* आधुनिक भारतीय इतिहास *
रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रशासकीय व्यवस्था ते मराठा साम्राज्याचा अस्त हा कालखंड कंपनीच्या वर्चस्वासाठी सर्वात महत्त्वाचा होता. ब्रिटिशांच्या धोरणाचा हस्त, लघु आणि कृषीउद्योग यावर विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता आणि संस्थानिक शासक यांची कंपनीच्या विरोधातील सार्वत्रिक प्रतिक्रिया म्हणजे 1857 चा स्वातंत्र्यलढा. 1857 च्या तदपूर्वी बहुभागात आदिवासी, कृषक इ. चे लढे अत्यंत महत्त्वूपर्ण राहिले. भारतात लागू नियमित कायदा, पीट्स अॅक्टचा प्रयत्न, 1793 ते 1853 पर्यंतचे 4 चार्टर अॅक्ट्स, 1858 ते 1935 पर्यंतच्या संघराज्य कायद्याची समर्पक संवैधानिक शब्दात मांडणी लिखाणात आहे. समाज प्रबोधन आणि प्रबोधनकार यांचे प्रयत्न, स्थानिक सत्ताधिशांनी कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारचे झालेले संघर्ष, शेजारी राष्ट्रांशी असणारी ब्रिटिशांची धोरणे यांचे एकच सुत्र होते ते म्हणजे व्यापारवादातून साम्राज्यवाद. भारतातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, कायदे, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांची नोंददेखील या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील संघटना, संस्था, व्यक्ति, पक्ष-मवाळ-जहाल, म. गांधीवादी आणि क्रांतीकारक विचारधाराद्वारा घडलेला घटनाक्रम हा संघर्षशील होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांचे प्रश्न, जातीय दंगली-हिंसा, राज्यघटनेची निर्मिती, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिलढा, सार्वत्रिक निवडणूका या घटनांतून भारतीय लोकशाहीचा विकास घडत गेला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बहुसांस्कृतिक भारतीय लोकशाहीला समृद्ध केले. उदयमुख भारताने केलेली शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, इतिहास, साहित्य इ. क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख प्रस्तुत ग्र्रंथात सविस्तररित्या नोंदविला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.