कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकांची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकांची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. राज्यशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात संविधान, संघराज्य प्रारूप व कार्यपद्धती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरूस्ती, माहितीचा अधिकार व मानव अधिकार, कार्यकारी मंडळ, न्यायालय, संविधानिक संस्था आणि गैर-संविधानिक संस्था, राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे मुख्य समस्या, राजकीय पक्ष, चळवळी, स्थानिक प्रशासन, संवैधानिक व कायदेशीर विकास मंडळे, महनीय व्यक्ती व त्यांचे कार्य, चीन-अमेरिकेचे शासन आणि राजकारण, संशोधन पद्धती, विचारप्रणाली, राजकीय संस्कृती, सनदी सेवा, भरती, प्रशिक्षण आणि बढती, सुशासन, पत्रकारिता, माध्यमे, विचारवंत, आंतरराष्ट्रीय संबंध वा राजकारण, सत्तासंतुलन, सामूहिक सुरक्षा, नि:शस्त्रीकरण, राजनय – आंतरराष्ट्रीय कायदा व संघटना इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.
Samagra Rajayashastra