महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संयुक्त महाराष्ट्राची एक फलश्रुती आहे. ‘महाराष्ट्र प्रशासन’ या संबंधीचे अध्ययन हे सामाजिक शास्त्रात मूलभूत स्वरूपाचे आहे. ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दाच्या माध्यमातून बहुविध स्वरूपाची चर्चा व तिचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया गतिशील स्वरूपाची आढळते. उपरोक्त विवेचनात महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती प्राप्त होते. प्रत्येक जिल्हा हा अनेक क्षेत्राच्या दृष्टिने उपयुक्त स्वरूपाचा आहे, पर्यावरण, इतिहास, सामाजिक संदर्भ, सहकार, उद्योग, राजकीय पार्श्वभूमी व नेते, वेगळेपण, याबाबत प्रत्येक जिल्ह्यांचे निराळेपणा वा वैशिष्ट्ये आढळतात.
सदरील पुस्तकात महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ठळक वैशिष्ट्ये, पुनर्रचित प्रशासकिय विभाग आणि जिल्हे, राज्य सचिवालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, ग्रामीण स्थानिक प्रशासन, शहरी स्थानिक प्रशासन – नगरपालिका, महानगरपालिका, इतर शहर स्थानिक संस्थाचे प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, आदिवासी विभाग विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, म. फुले, आण्णासाहेब पाटील, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास महामंडळ, विकेंद्रीकरण वगैरे प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. सदरील पुस्तकातील मांडणी ही स्पष्ट व सुबोध भाषेत करण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तक नेट-सेट, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षार्थ्यांना तसेच वाचक, अभ्यासू आणि जिज्ञासूंनासुद्धा उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Maharashtrachya Prashasanachi Olakh