राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.
Bhartiya Rajkiya Vicharvant