-
प्राकृतिक भूगोल
Rs.595.00प्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.
प्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.Prakurtik Bhugol
-
प्राकृतिक भूगोल
Rs.285.00प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.Prakurtik Bhugol