-
प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)
Rs.325.00प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.
Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)
-
प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206)
Rs.225.00प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.
या ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.Prachin Bharatacha Itihas (Praranbhapasun Te CE 1206)