-
बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार
Rs.450.00बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा असा एक भाग आहे जो जनतेकडून ठेवी स्विकारुन उद्योग-व्यवसायाला भांडवल उपलब्ध करुन देण्याचे मध्यस्थ म्हणून कार्य करतो. ज्या देशातील बँकींग आणि वित्तीय प्रणाली विकसित आहे त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो. बँकींग प्रणाली ही अर्थव्यवस्था रुपी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य करते.
Bankingchi Tatve ani Vyavhar
-
बजेट मसुदा आणि बचत धोरण
Rs.160.00संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
सदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.