-
भारतीय आर्थिक धोरण
Rs.160.00राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 (झ) साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे. -
भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)
Rs.210.00देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.
Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 1)