-
भौगोलिक माहिती प्रणाली
Rs.110.00भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.
भौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.
भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.Bhaugolik Mahiti Pranali
-