• महाराष्ट्राचा भूगोल

    महाराष्ट्राचा भूगोल

    भूगोल हा विषय तसा गतिमान असून तो निरीक्षण, अवलोकन आणि कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून असतो. म्हणून असे म्हटले जाते भूगोल हा विषय पायाने डोक्यापेक्षा अधिक समजतो, उघड्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवतात. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे ज्ञान आवश्यक असते किंबहूना भूगोलाच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
    महाराष्ट्राचा भूगोल या ग्रंथात महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, नदीप्रणाली, महाराष्ट्रातील विविध साधनसंपदा या उपघटकांचा अभ्यास पहिल्या विभागात तर महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील लोकसंख्या व वस्ती, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांचा समावेश दुसर्‍या विभागात करण्यात आला आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना सदरील ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Rs.285.00
    Add to cart
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून यात – 1) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय – महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल, 2) महाराष्ट्राची लोकसंख्या – महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, महाराष्ट्रातील नागरीकरण, 3) महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था – राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन, शेतीची उत्पादकता, विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन, 4) महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना – राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये, लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास, 5) महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र – महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी, सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या, महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग इत्यादींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

    Maharashtrachi Arthvyavstha

    Rs.265.00
    Add to cart