-
-
वित्तीय साक्षरता
Rs.250.00वित्तिय साक्षरता आणि वित्तीय समावेशन हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थांचा मुलभूत भाग झाला आहे. आधुनिक काळात प्रत्येक नागरिकास आपली आर्थिक प्रगती करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक व्यक्ती पैसा/उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शारीरीक आणि बौद्धिक श्रमात सहभाग घेतात. असं मानलं जात की पैसा कमावण्यापेक्षा तो जतन करणे आणि त्यात वाढ करणं जास्त कौशल्यपूर्ण आहे. हे कौशल्य ज्याने आत्मसात केले तो निश्चितच प्रगती करतो. वर्तमान बरोबर भविष्याची चिंता हा मानवाचा स्थायी भाव आहे. चालू उत्पन्नाचा मोठा हिस्सा उपभोगावर खर्च करुन थोडी-थोडी बचत केली, तिची गुंतवणूक केली, संपत्ती निर्मिती केली. भविष्य निश्चितच उज्वल होईल. याची जाणीव वित्तीय साक्षरता निर्माण करते. वित्तीय साक्षरतेतून व्यक्तीस बँकींग व्यवहार करता येतात, पैशांचे हस्तांतरण करता येते, पैशाची योग्य गुंतवणूक करता येते. पण यासाठी देशातील बँकींग व शेअर बाजाराचा विकास आणि विस्तार आवश्यक आहे. भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकाची मोठी आर्थिक सत्ता होण्यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक आहे.