-
-
व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स
Rs.175.00व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.
Vyaktimatva Vikas Ani Soft Skills