-
व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे
Rs.385.00‘व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे’ या ग्रंथात वाणिज्य व उद्योग -अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती, भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय. व्यवसाय – क्षेत्रे व स्वरूप, प्रकार, असंघटीत व्यवसाय, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार. उद्योजकता विकास – व्याख्या, संकल्पना, उद्योजकतेचे स्वरूप, महत्त्व व कार्ये, वैशिष्ट्ये, सिद्धांत, उद्योजकाचे प्रकार, वर्गीकरण, अभिप्रेरण. नवीन उपक्रम – उपक्रम उभारणीचा निर्णय, व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध, नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणाऱ्या उद्योजकाची भूमिका, व्यवसायाची व्यवहार्यता व्यवसायाचा आकार किंवा आकारमान. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था – घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, मॉल विक्री व्यवस्था, स्पेशालिटी स्टोअर्स या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Vyavsay Sanghatanechi Multatve
-
व्यवस्थापन गतिशीलता
Rs.135.00जीवनात नावीन्यपूर्ण करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा लिखाणरूपी शब्दसखा रुसून बसतो. परंतु जेव्हा या पुस्तकाचे लिखाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा ही अनुभूती झाली नाही, कारण हे पुस्तक लिहिताना विषयाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा कयास होता. मानवाच्या जीवनाची यशस्विता ही त्यांच्या योग्य व्यवस्थापनावरच अवलंबून असते. यशस्वी होण याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखा आहे. जीवनात यशस्वितेची कास धरण्यासाठी नियोजन, योग्य निर्णय व प्रेरणा या गोष्टींना फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल याची मी ग्वाही देतो.