-
व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता
Rs.175.00सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रथम वर्ष वाणिज्य अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक पर्यावरण हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न-2020 अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिलेले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये निर्माण व्हावी, याचाही विचार आम्ही केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिलेले आहे, प्रत्येक मुद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. त्यामुळे सदर पुस्तकाचा केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना देखील हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आम्हाला निश्चितच खात्री वाटते. -