• सकारात्मक मानसशास्त्र

    सकारात्मक मानसशास्त्र

    सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्‍याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.

    Sakaratmak Manasashatra

    Rs.195.00
    Add to cart
  • संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

    संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

    मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas

    Rs.250.00
    Add to cart