-
सामाजिक मानसशास्त्राची ओळख
Rs.125.00मानव हा अनुकरणशील प्राणी आहे. तो समाजातील विविध गोष्टींचे अनुकरण करतो. तो समाजशील प्राणी आहे. समाज म्हणजेच समूह. समूहात राहुन मानवाने आपली प्रगती साधली आहे. समूहात, नातेवाईकांत, कुटुंबात, मित्र-मंडळीत राहणे मानवाला अधिक आवडते. समूहात राहून आंतरक्रिया मानव करत असतो. या आंतरक्रियांच्या माध्यमातून तो आपला सामाजिक विकास घडवून आणतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आंतरक्रिया जलद होत आहेत. सामाजिक माध्यमांद्वारे समूह अथवा व्यक्ती अधिक निकट आल्यासारखे वाटते. या सगळ्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो. प्रस्तुत पुस्तकात सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तिक पातळी प्रक्रिया, आंतरवैयक्तिक प्रक्रिया, समूह गतिशीलता इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.
Samajik Manashashrachi Olkha
-
सामान्य नकाशाशास्त्र
Rs.135.00नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे ज्ञान अगोदर तो चिन्हे, संकेत, रेखाचित्रे व चित्रांचा उपयोग करीत असे. त्यामुळे नकाशाशास्त्र ही कला खूपच प्राचीन आहे हे स्पष्ट आहे.
जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करतांना मानव हा नकाशांचा वापर खूप पूर्वी पासून करीत आला आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक लेण्या, प्राचीन स्थळे, शहरे, गावे यांचे निरीक्षण केले असता यात चिन्हे व रेखाचित्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. यावरून आपल्याला कल्पना येते की, प्राचीन काळातील लोकांनी नकाशाशास्त्रांची रचना केली, त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर करून नकाशाशास्त्राचा विकासही केला. आधुनिक काळात मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा विकास होत गेला व तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की, सामान्य माणूस ही नकाशाशास्त्राचा वापर करू लागला आहे. हवाई छायाचित्र, दूरसंवेदन, उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली व स्थान निश्चिती प्रणाली, संगणक, मोबाईल, टेलिव्हीजन यावर नकाशाशास्त्राचा वापर मानव केल्याशिवाय रहात नाही.
Samanya Nakashashastra