पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या सर्वच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून ठरणारा ‘भारतीय वित्तीय प्रणाली’ या विषयावरील अतिशय सुलभ व सोप्या शब्दात मांडणी केलेली हे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.
आधुनिक काळात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. तसेच बँकेत्तर वित्तीय संस्था सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्यांचे कार्ये तितकेच उपयुक्त आहे. देशाच्या औद्योगिकरणासाठी वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेबाजार आणि भांडवल बाजारात अनेक नवीन साधने प्रविष्ट झाली. अनेक संस्था नव्याने उदयास आल्या. यात भाडेपट्टा वित्त संस्थांपासून ते गृह वित्त पुरवठा संस्था, परस्पर निधी संस्था यांचा समावेश होतो. या बदलत्या परिस्थितीत नियंत्रणे सक्षम करण्यासाठी ‘सेबी’ सारख्या संस्था, क्रिसीलसारख्या पत मोजमापनाच्या श्रेणी जाहीर करणार्या यंत्रणांची गरज निर्माण झाली, आणि तशा तरतूदीही क्रमाक्रमाने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात केल्या गेल्या.
Bhartiya Vittiya Pranali