-
व्यवस्थापन गतिशीलता
जीवनात नावीन्यपूर्ण करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा लिखाणरूपी शब्दसखा रुसून बसतो. परंतु जेव्हा या पुस्तकाचे लिखाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा ही अनुभूती झाली नाही, कारण हे पुस्तक लिहिताना विषयाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा कयास होता. मानवाच्या जीवनाची यशस्विता ही त्यांच्या योग्य व्यवस्थापनावरच अवलंबून असते. यशस्वी होण याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखा आहे. जीवनात यशस्वितेची कास धरण्यासाठी नियोजन, योग्य निर्णय व प्रेरणा या गोष्टींना फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल याची मी ग्वाही देतो.
-
-
-
शेअर बाजार परिचय
शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे, More risk more profit, No risk no profit हे या बाजाराचे तत्त्व स्विकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी या बाजारात गुंतवणूक न करणेच योग्य. पण जर शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल, बाजार विश्लेषण करता येत असेल, बाजार हालचालीवर चांगले लक्ष असेल, प्रॉफिट बुक करण्यात तत्परता असेल तर हा बाजार चांगला परतावा प्राप्त करून देतो.
-
सकारात्मक मानसशास्त्र
सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.
Sakaratmak Manasashatra
-
समाजशास्त्र परिचय
समाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.Samajshastra Parichay
-
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही, तर उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचे अभ्यासक विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबरोबरच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन दिली आहे. यामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, संस्कृतीच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक आणि कार्य, तसेच सामाजिकरणाचे अर्थ, व्याख्या, मूलतत्त्वे, उद्दिष्टे, अवस्था, साधने आणि सिद्धांत यांची माहिती समाविष्ट आहे.
याशिवाय, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, यांचे अर्थ, प्रकार, घटक, स्तरीकरणाची कार्ये, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम आणि प्रोत्साहन करणारे घटक यावर सुद्धा चर्चा केली आहे. सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि कारणे यांची सुद्धा माहिती या ग्रंथात दिली आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. -
सांख्यिकीय पद्धती
आजच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही शास्त्रात सांख्यिकीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांख्यिकीमध्ये अंकाच्या स्वरूपात असलेली माहिती विशिष्ट पद्धतीने मांडली जाते व त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. आधुनिक काळात सरकारने कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला आपल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनासाठी प्रभावी साधन असल्यामुळे संख्याशास्त्राचा उपयोग हा बहुतेक सर्व शास्त्रांत केला जातो. सांख्यिकीची व्याप्ती ही विशाल स्वरूपाची आहे. विविध शास्त्राच्या अभ्यासात सांख्यिकीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीच्या सहाय्याने मूळ सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सांख्यिकीच्या सहाय्याने संग्रहीत सामग्रीचे वर्गीकरण, श्रेणीयन, सारणीयन आणि विश्लेषण करण्यात येते. याचप्रमाणे व्यवहारिक जीवनात ही सांख्यिकीची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Sankhyikiya Paddhati
-
सामाजिक मानवशास्त्र
आधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.
मानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.
सदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.
Samajik Manavshastra
-
-
सूक्ष्म अर्थशास्त्र
प्रिय विद्यार्थी मित्र व प्राध्यापक बंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार (NEP 2020) बी.ए. प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
सदरील ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे. -
-
हवामानशास्त्र
पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.Hawamanshastra