• Indian Economic Policy – I & II

    Indian Economic Policy – I & II the content of the book is designed to introduce students to the fundamental concepts of the Indian economy, its sectors, and demographic trends.
    In Semester I, Chapter 1 discusses the basics of the economy, focusing on the differences between developed and developing economies, policy-making at various government levels, and recent developments in the Indian economy. Chapter 2 explores the role of agriculture, industry, and the service sector in India, as well as the interdependencies among these sectors and their contributions to India’s economic development. It also covers India’s New Economic Policy.
    Semester II focuses on demographic issues in India. Chapter 3 addresses the country’s demographic profile, including occupational distribution, population policies, and poverty, with a focus on types of poverty, causes, and measures for poverty alleviation. The practical component of Semester II involves studying the demographic structure of a specific village, ward, or city, which allows students to apply their learning to real-world situations.
    The purpose of this book is to provide students with a clear understanding of the interconnections between economy and society, population policy, and to encourage critical thinking about socio-economic conditions. The book also compares the Indian economy with other global economies and emphasizes its multidisciplinary relationship with various social sciences.

    250.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्था

    भारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart
  • मानवी भूगोल व प्रात्यक्षिके

    मानवी भूगोल म्हणजे मानवाच्या आणि त्याच्या पर्यावरणाच्या आंतरसंबंधांचा अभ्यास. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे आहे, जेणेकरून मानवी विकास आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट होईल.
    मानवी भूगोलाचा अभ्यास करताना, मानव व निसर्ग यांच्यातील विविध घटकांची समज घेतली जाते. मानवी जीवनशैली, रोजगार, समाजव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये जैविक, भौगोलिक आणि सामाजिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पर्यावरणाशी मानवी समायोजनामुळे पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहिले आहे, तसेच विविध प्रकारच्या पर्यावरणामुळे मानवाचा जीवनशैलीत विविधता येते.
    मानवी भूगोल पृथ्वीवरील विविध प्रदेशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिक भिन्नता समजून घेते. यामध्ये शारीरिक ठेवण, पोषाख, चालीरिती, रूढी, परंपरा आणि मानवाच्या जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय घटकांच्या प्रभावामुळे मानवाची जीवनशैली आणि संस्कृती विकसित होतात, ज्यामुळे विविधतेला महत्त्व दिले जाते.
    मानवी भूगोलाचा अभ्यास केल्याने आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद समजून घेता येतो, जो मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे.

    110.00
    Add to cart
  • संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास

    संप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.
    यादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.

    410.00
    Add to cart