
विपणनाची मूलतत्त्वे
Rs.70.00सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या प्रथमवर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेक्टीव विषयाअंतर्गत 2 क्रेडिट साठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विपनणाची मूलतत्वे हा विषय कला शाखेच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी.पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

वैकासिक मानसशास्त्र
Rs.145.00वैकासिक मानसशास्त्राची सुरवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. या काळातच बालकांचा आणि किशोरांचा मानसशास्त्रीय मनोव्यापारांचा अभ्यास केला गेला. उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांनी अर्भकांच्या वर्तनाचे वैकासिक स्वरूप मांडले. डार्विन यांच्या संशोधनातूनच बालकांच्या वृत्ताला शास्त्रीय स्थान प्राप्त झाले. समायोजनाच्या दृष्टीने सुरवातीला वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी वयाचा आणि विकासावस्थांचा अभ्यास केला. 19 व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य देशांमध्ये विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरवात झाली. मानसशास्त्रामध्ये हालिंगवर्थ, जीन पीयाजे, स्टॅन्ले हॉल, डार्विन, बुहलर, प्रेसी, कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, कोन्राड लॉरेन्झा, ब्रॉनफेन ब्रेनर, अलबर्ट बांडूरा, बी. एफ. स्किनर, जे.बी. वॉटसन, एरिक एरिक्सन, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यासारख्या अनेकांनी दीर्घ परिश्रम करून आपापले महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध केले. 1970 च्या दशकानंतर मानव विकासासंबंधी विचारप्रवाह अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांमध्ये दृढ झाला.
प्रस्तुत पुस्तकात जीवनकक्षा दृष्टीकोन, विकासाचे स्वरुप, विकासाचे सिद्धांत, जीवनकक्षा विकास, अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, नवजात अवस्थेचे मूल्यांकन, शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, भाषा विकास, शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास इ. विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.Vaikasik Manasshashtra


