• असे सोमेश्वर पुरातन

    श्रीस्कंदपुराणाने प्रभासक्षेत्रातील सोमेश्वराचा उल्लेख केलेला आहे आणि श्रीसंत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून केलेला सोमेश्वराचा उल्लेख हा श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वराचा आहे. त्यामुळे श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वर, श्रीसंत नामदेव महाराजांच्या अभंगातील सोमेश्वर आणि श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील सोमेश्वर हा एकच आहे, हे पटवून देण्यासाठी अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी ‘असे पुरातन सोमेश्वर’ हा ग्रंथनिर्मितीकरीता केलेला खटाटोप वाखाणण्याजोगा आहे. अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी वयाची 68 वर्ष ओलांडली असून ते 90 टक्के अंध आहेत. असे असले तरी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या संत वाङ्मयाच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी आपल्या दांडग्या स्मरणशक्तीने तोंडी सांगावे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलोचनाबाई चौधरी यांनी ते लिहून घ्यावे अशा पद्धतीने ‘असे सोमेश्वर पुरातन’ हा ग्रंथ सिद्धीस आला आहे. श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्तस्थळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने तयार करण्यात आलेला हा ग्रंथ वाचक, भाविक, मुमुक्षु, वारकरी सांप्रदायिक यांच्यासाठी तसेच संत वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना सर्वांसाठी निश्चितच उपयोगी पडेल अशी खात्री आहे.

    – डॉ. जगदीश पाटील, भुसावळ

    Ase Someshwar Puratan

    150.00
    Add to cart
  • श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)

    श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

    नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
    आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
    विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
    निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
    संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
    शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
    विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
    मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
    प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
    सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
    मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
    संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
    ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
    ‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥

    – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरीकृत (दाशरथी)

    Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)

    350.00
    Add to cart