• माती

    जीवनात आईचे स्थान महत्वाचे आहे. ती दूध पाजून मोठे करते. संस्कार करते. तिचे ॠण फिटू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माती हीसुध्दा आईच्याच स्थानी आहे. शेतीत राबताना अनेक अनुभव आलेत. तिच्या कुशीत वाढलेली विविध पिके पाहून काव्य सुचले. कष्ट करताना अनुभव आलेत तेच या ठिकाणी मांडलेत. तिच्यामधून जे अन्नधान्य पिकले त्यावर शरीर, मन पोसले गेले. मातीने कवीला समृध्द केले. शेतीविषयी लळा लावला. जीवनाचा अंतही मातीतच होणार आहे. तिच्या कुशीतच विसावा मिळणार आहे. म्हणून तिच्याविषयीची कृतज्ञता मानून काव्यसंग्रहास ‘माती’ हे नाव दिले.
    बालपणापासून शेतकरी कुटूंबात येणारे अनुभव पाठीशी होते. तेच सगळे विचार काव्यातून व्यक्त केलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या व्यथा, दु:ख, ग्रामीण जीवन, ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती अतिशय सुंदर शब्दात येथे व्यक्त झाली आहे. कविवर्य ना.धों. महानोरांच्या शब्दांत –

    “ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्यं येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”

    Mati Kavyasangrah

    160.00
    Add to cart
  • संतांचे शब्दामृत

    प्रस्तुत ग्रंथात ‌‘श्रीतुकाराम गाथा’ मधून निवडक अभंग घेऊन त्यावर भाष्य करण्यात आले आहे. क्षणोक्षणी हाचि करावा विचार, सुख पाहता जवापाडे, म्हणऊनि शरण जावे, कन्या सासुऱ्याशी जाये, बोल बोलता वाटे सोपे, बळियाचे अंकित, मढे झाकुनिया करिती पेरणी, असो खळ ऐसे फार हे निवडक व जीवनविद्या शिकविणारे अभंग घेतलेले आहेत. सर्वच अभंग जीवनाला योग्य वळण देणारे आहेत. म्हणून संतसंगतीची तातडी जीवनात करावी. कारण की आयुष्य हे क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन तातडीने संतसमागम करावा. म्हणजे पुढील विघ्ने टळतील. मनाला शांतता लाभेल. आपल्या हातून वाईट कार्य घडणार नाही.संपूर्ण विश्वालाच या संत विचारांची गरज आजही आहे. हा संत वारसा आपण सर्वांनी चालविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केलेले कार्य उत्कृष्ट आहे. सर्वांनी मनापासून वाचावा, जीवनाचे मोल समजून घ्यावे व भविष्याकडे योग्य वाटचाल करावी. प्रस्तुत ‌‘संतांचे शब्दामृत’ हा ग्रंथ जगत्‌‍मान्य-वाचकप्रिय होईल, यात शंकाच नाही.

    Santanche Shabdamrut

    125.00
    Add to cart