विश्वाचे कोडे उलगडणाच्या तत्त्वचिंतकांच्या अथक प्रयत्नांचे, त्यांच्या न संपणार्या शोधयात्रेचे आकलन करणे हा प्रस्तुत पुस्तकाचा प्राथमिक उद्देश आहे. तत्त्वज्ञान या विषयाबद्दल सर्वसामान्यांमध्ये बरेचसे गैरसमज आढळून येतात. प्रस्तुत पुस्तकात तत्त्वज्ञान विषयाचे सामान्य रुप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यामुळेच. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्राचीन (मुख्यत्वे ग्रीक) व मध्ययुगीन स्वरूपाचे विवरण करणारी पुस्तके मराठीत फारशी आढळत नाहीत. इंग्रजी पुस्तके तुलनेने पुष्कळ आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ती तितकीशी रुचत नाहीत, आपली वाटत नाहीत.
सदरील विवरण जरी पाश्चात्त्यांच्या प्राचीन व मध्ययुगीन तत्त्वज्ञानाच्या संदर्भात असले तरी तत्त्वज्ञान विषयात अंतर्भूत असलेल्या प्रमुख शाखांचे त्यातील वर्णन सर्वसमावेशक असेच आहे. पाश्चात्त्य जगात प्राचीन तत्त्वविचारांचे नव्याने संशोधन व परिशीलन निरंतर सुरू असते हे लक्षात घेवूनच प्रस्तुत पुस्तकलेखन करण्यात आले आहे.
Prachin V Madhyayugin Pashchattya Tattvadnyan (Sankshitpa Itihas)