खान्देशातील साहित्याची वाङ्मयीन मौलिकता ही एकूण मराठी वाङ्मयाच्या संदर्भातच तपासून पाहायला हवी. या दृष्टीने अन्य कोणत्याही वाङ्मयप्रकारांपेक्षा कविता ह्या वाङ्मय प्रकारात खान्देशातील लेखकांनी घातलेली भर लक्षणीय स्वरूपाची आहे; हे महत्त्वाचे निरीक्षण येथे नोंदवावे लागते. खान्देशातील ‘कवी केशवसुत पुरस्कार’ प्राप्त करणाऱ्या गणेश चौधरी, त्र्यंबक सपकाळे, पुरुषोत्तम पाटील, अनुराधा पाटील, उत्तम कोळगावकर, मनोहर जाधव, शशिकांत हिंगोणेकर आणि मंगेश नारायणराव काळे या आठ कवींची कविता एकत्रित स्वरूपात वाचताना सन 1950 ते 2000 या कालखंडातील मराठी कवितेचा व्यापक पट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मराठी कवितेच्या अशा दीर्घ वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर ह्या कवींची कविता उभी आहे.
Matit Ajun Oal Aahe