ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. धुळे, नंदुरबार व जळगावमध्ये भिल्ल, पावरा, मावची कोकणी अशा जमाती प्रामुख्याने आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव भारताचे मुळनिवासी यांचे पारंपारिक जीवन विविध माध्यमातील कला विष्कारांनी संपन्न समृद्ध झाले आहे. संगीत, नृत्य, नाट्य, मौखिक, वाङ्मय यामुळे जीवनातील दुःख, दारिद्य्र सोसूनही आनंदी राहण्याची कला त्यांनी शतकानुशतके जोपासली आहे.
आदिवासींच्या जीवनाचे विविध पैलू समजून घेऊन आदिवासींची भाषा, कुळे, गोत्रे, कुटुंब, समाज, प्रथा-पंरपरा, त्यातून आदिवासींची बनलेली विशिष्ट जीवनशैली आणि संस्कृती याविषयीच्या नोंदी सदरील पुस्तकात आहेत. सदरील माहिती एखाद्या अभ्यासकाप्रमाणे सूत्रबद्धरीतीने मांडलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ लहानसा का होईना, पण अभ्यासक, जिज्ञासू, विद्यार्थी तसेच सर्वांसाठी संदर्भसाधन म्हणून उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.
Satpudyatil Adivasi Bhill