• प्रेषितांचे बेट

    ‌‘कवी बळवंत भोयर नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी. विविध कामगार संघटनेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. म्हणूनच त्यांची कविता सर्वसामान्यांच्या आयुष्यातील जाहीरनामा ठरली. एवढी मार्मिकता त्यांच्या कवितेत मला जाणविली. नवे समाजभान तसेच कष्टकऱ्यांच्या संस्कृतीची मुलतत्त्वे त्यांची कविता अधोरेखित करतांना दिसते.’

    – कविवर्य नारायण सुर्वे

    ‌‘समकालिन समाजवास्तवाचे भान आणि त्यावर परखड भाष्य ही ‌‘प्रेषितांचे बेट’ या गाजलेल्या कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. सांस्कृतिक आक्रमनाने पोखरलेल्या मध्यमवर्गीय मानसिकतेची दखल हा या काव्याचा इतर सर्व काव्यसंग्रहापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार आशय आहे. त्यामुळे नव्या पिढीतील आघाडीचे व दमदार कवी म्हणून काव्य जगतात प्रसिद्ध आहे.’

    – डॉ. वि. स. जोग

    ‌‘प्रेषितांचे बेट’ हे एक सामाजिक चिंतन आहे. यातील कविता शोषणाच्या विरोधात संवेदनशील मनाचे उद्गार शब्दबद्ध करतात. कवितेतील आशय, शब्दांची मांडणी, ओघवती तितकीच काठिण्यपूर्ण भाषा, माधुर्यपुर्ण प्रास्ाादिकता, ओजस्वी तेजस्वी प्रतिमादर्शन, स्वतंत्र्य लेखनशैली हा डॉ. कवी बळवंत भोयर यांच्या काव्यशैलीचा मृदगंध आहे.

    – डॉ. विशाखा कांबळे

    ‌‘कवी बळवंत भोयर यांच्या ‌‘प्रेषितांचे बेट’ मधील कविता व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवरील वेदनेचा तळ शोधण्याची भूमिका बजावतात. वरपांगी तिच्यात नम्रपणा जाणवत असला तरी उरात मात्र शोषणाविरुद्ध निर्माण झालेली क्रांतीची धग आहे. त्यामुळेच मानवतेचा ध्वज खांद्यावर मिरवण्यास ती नव्या दमाने प्रतिबद्ध होते.’

    – डॉ. अनंता सूर

    Preshitanche Bet

    135.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील बोली व भाषा

    वास्तविकत: बोली ही जननिष्ठ प्रमाण आहे. बोली ही जन्मतः मानवी मनाशी जुळलेली आहे. तिचे स्वरुप अत्यंत संवेदनशील चेतनामय आहे. या संवेदनशील मनाला बोलीचे सदस्य रुप आनंदित करतेच. रसास्वाद, आकलनबद्ध सुक्ष्म निरीक्षणातून बोलीचा मधूरबाज सर्वसामान्यांना आपलेसा करुन जातो. महाराष्ट्रात व त्यांच्या सीमावर्ती भू-भागात फार प्राचीन काळापासून सुमारे दोन हजार वर्षाच्या आधीपासून लोकांमध्ये मराठी बोलींचा वावर होता असे दाखले मिळाले आहेत. भाषा आणि बोली यांचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध सर्वांना माहित असले तरी दोहींचे स्वरूप तेवढेच जटील व गुंतागुंतीचे आहे. या समस्येची थोडी फार उकल भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतू बोली आणि भाषा वर्गीकरणाने सर्वच प्रश्न सुटले नाहीत. प्रस्तुत ग्रंथात बोली व भाषेच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा महत्त्वपूर्ण विचार मांडलेला आहे. बोलीची प्रादेशिकता व स्वरुप यांची सुंदर मांडणी लेखकांनी अधोरेखीत केली आहे. कोणत्याही भारतीय भाषा अभ्यासकांचे चटकन लक्ष वेधून घेणारा हा संकलित लेखांचा संग्रह प्रामुख्याने बोलीविषयक आहे.

    Maharashtratil Boli Va Bhasha

    395.00
    Add to cart