प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.