सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.
प्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Prakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)