आज साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे स्वरूप कोणत्याही एका समाज व वर्गापुरते सिमीत राहिलेले नाही. शहरांपासून तर खेड्यापाड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या आचार-विचार आणि प्रवाहाची संमेलने भरविली जातात. ग्रामीण साहित्य, फुले-शाहू-आंबेडकरवादी साहित्य, संतसाहित्य, झाडीबोली साहित्य, खान्देशी साहित्य, आदिवासी साहित्य आणि जनसाहित्यासारखे नानाविध प्रवाह संमेलनामध्ये सामील होत आहेत. परंतु संमेलने कोणत्या गाव, प्रांत आणि देशातील आहे यापेक्षा या संमेलनातून खरा मानवतावादी विचार लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहचतो काय? यावर नव्याने विचारमंथन होण्याची गरज भासू लागली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि नव्या-जुन्या पिढींचा समावेश असलेली ही मराठी माणसाची साहित्य संमेलने आहे. अनेक संमेलनातील एकेका अध्यक्षीय भाषणाचा वेध घेणारा हा मौलिक संपादित ग्रंथ आहे. ही महाराष्ट्रातील निवडक अध्यक्षीय भाषणे शोधून काढण्याचे जिकिरीचे काम नव्या पिढीतील कवी-समीक्षक डॉ.अनंता सूर यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मराठी साहित्यावर आणि साहित्य संमेलनांवर प्रेम करणार्या वाचकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे.
Sahitya Samelane Anek Adhyakshiya Bhashan Eka