डॉ. अपर्णा साबणे यांनी संत एकनाथांच्या व्यक्तित्वातील तसेच त्यांच्या अभंगातील हे वेगळेपण विचारात घेऊन संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय दृष्टीने अभ्यास करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय अभ्यास करताना त्यांनी काव्य म्हणून अभंगाकडे पाहण्याची रसिकता व वाङ्मयीन आस्वादाची दृष्टीही बाळगली ही विशेष. त्यामुळे त्यांचा अभ्यास रुक्ष न होता, नाथांच्या अभंगांचा काव्यात्म आस्वादाचा प्रत्यय देणारा झाला आहे. हे प्रथम सांगावेसे वाटते.
डॉ. अपर्णा साबणे यांनी एकनाथांच्या स्फुटरचना, कथा काव्य, चरित्र काव्य, विविधस्वरुपी अभंग, भारुडे इत्यादींच्या स्वरुप-विशेषांची समीक्षा करून या रचनांतील लोकतत्वे उलगडून दाखविण्याचा या लोकतत्त्वांच्या स्वीकारातून अभंगांना प्राप्त झालेला वेगळेपणा, त्यांतील लोकपण इत्यादी वैशिष्ट्यांची सोदाहरण चर्चा केलेली आहे.
– प्रा. डॉ. शरद व्यवहारे
Sant Ekanathanchya Abhangatil Loktatva