भारताच्या राजकारणाचे गतिशील स्वरूप लक्षात घेवून भारताच्या घटनाक्रमात, घडामोडीत झालेल्या बदलाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधानाच्या मुलभूत संरचनेला आधार मानून भारतीय राजकारणाचे व्यावहारिक अध्ययन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताचा सांविधानिक इतिहास, भारतीय संविधानाची निर्मिती, प्रस्तावना, नीतिनिर्देशक तत्त्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये, भारताची संघराज्यात्मक व्यवस्था केंद्र व राज्य संबंध व त्यांच्यातील तणावग्रस्त क्षेत्र, केंद्रीय कार्यकारीमंडळ, केंद्रीय विधिमंडळ, भारताची न्यायव्यवस्था व व सर्वोच्च न्यायालय, जनहितवाद व न्यायालयीन सक्रियतावाद, संविधान दुरुस्तीची प्रक्रिया, राज्याचे कार्यकारी मंडळ, राज्याचे विधिमंडळ, उच्च न्यायालय, भारतात संसदीय शासनव्यवस्थेचा इतिहास व गुणदोष, भारतातील पक्षव्यवस्था, प्रादेशिक पक्ष व्यवस्था, भारताच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका, भारतातील निर्वाचन व्यवस्था, निर्वाचन मंडळ, निर्वाचन व्यवस्थेचे दोष, निवडणूक सुधारणा, भारताच्या राजकारणात जातीयतेची, धर्माची, वर्गाची, सांप्रदायिकतेची व वांशिकतची भूमिका, भारताच्या राजकारणावर प्रादेशिकतेचा प्रभाव, भारतातील आरक्षणाचे राजकारण, भारतातील मागास वर्गाचे व भारतातील अल्पसंख्याकाचे राजकारण, भारतातील आतंकवादाचे राजकारण, भारतातील राजकीय गुन्हेगारीकरण, भारतातील पक्ष बदलाचे राजकारण, भारतातील आघाडीचे राजकारण, भारतातील लिंग भेदभावाचे राजकारण, भारतीय राजकारणातील भ्रष्टाचार, भारतातील दबावगट, भारतातील सामाजिक चळवळी, भारतातील नियोजित विकासाचे राजकारण, भारतातील विविध आयोग व संस्था, भारतातील पंचायतराज व्यवस्था व समस्या याचे अद्ययावत व सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय राजकारणाच्या स्वरूपाची अनुभवाधिष्ठित व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे.