अलिकडच्या माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. भूगोलशास्त्राच्या सर्वंकष अभ्यासासाठी विस्तृत माहिती व आकडेवारीची गरज असते. अशा आकडेवारीवर संस्कार करून उपलब्ध निष्कर्षाचा भविष्यातील नियोजन व व्यवस्थापनासाठी उपयोग होतो. अशी विस्तृत माहिती अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे भूगोलशास्त्राच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी अतिशय महत्वाची ठरते. बुद्धीवादी मानवाने ज्ञानाच्या जोरावर माहितीवर संस्कार करून, त्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून नवनवीन व उपयुक्त माहितीची भर भूगोलशास्त्रात टाकली आहे. त्या सर्व माहितीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला व्हावा की ज्यातून ‘मानवी कल्याण’ खर्या अर्थाने साधता येईल एवढा प्रामाणिक हेतू मानव बाळगून आहे.
सदरील भू-माहितीशास्त्र या पुस्तकात प्रामुख्याने सुदूर संवेदन, निष्क्रीय संवेदक, हवाई छायाचित्र, सक्रीय दुरस्थ संवेदक, भूप्रतिमाने, भौगोलिक माहिती प्रणाली, संगणक आणि जागतिक स्थान निश्चिती यासारख्या आवश्यक घटकांचा समावेश केल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Bhu-Mahitishashtra