
भारतीय सामाजिक समस्या
Rs.375.00मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.
मात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.
सदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
Bhartiy Samajik Samasya

समाजशास्त्र परिचय
Rs.295.00आधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.
सदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.Samajshastra Parichay


