• औद्योगिक भूगोल

    पृथ्वीच्या विविध भागात आढळणार्‍या साधन संपदा, त्यांचा विनियोग व औद्योगिक विकास यांच्या बदलानुसार कारखानदारीचे स्वरूप व व्याप्ती बदलते. पूर्वीच्या काळात उद्योगावर प्रामुख्याने स्थानबद्ध घटकांचा जास्त प्रभाव होता परंतु आजच्या काळात स्थानबद्ध घटकाबरोबरच जास्त प्रभाव अस्थायी घटकांचा परिणाम उद्योगांच्या स्थान व विकासावर होत आहे. जसे मुंबई शहरात आर्द्र हवामान असल्याने कापसाचा लांब धागा निघतो त्यामुळे सुती कापड गिरण्याचे केंद्रीकरण झालेले होते. परंतु आता मानवनिर्मित कृत्रिम हवामान निर्मिती तंत्रज्ञान प्रगत झाल्याने मुंबईतील सुती कापड उद्योग महाराष्ट्रातील अंतर्गत भागातील नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव या शहरात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे औद्योगिक भूगोलाचे स्वरूप स्थलात कालपरत्वे बदलत आहे. त्यामुळेच औद्योगिक भूगोलाला गतीमान शाखा मानले जाते.

    मानवाच्या सामाजिक विकासाबरोबरच आर्थिक विकासाचे महत्व आहे. आर्थिक विकासात औद्योगिक विकास व भूगोल यांचे महत्वाचे योगदान आहेत. सदरीलपुस्तकात अद्ययावत आकडेवारी, महत्त्वाचे मुद्दे, अवलोकन होण्यासाठी नकाशा, आकृत्या, तक्ते, चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. विविध विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व स्पर्धा परिक्षांसाठी पुस्तक उपयुक्त आहे.

    Audyogik Bhugol

    250.00
    Add to cart