• प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली

    मानवी सभ्यतेत ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या मानवी समुहाने आत्मसात केलेले ज्ञान हे त्याच्या प्रगतीचे व मानवी सभ्यतेचे द्योतक असते. भारतीय ज्ञानप्रणालीचे शिक्षण संक्रमणातील स्थान व एकूणच शैक्षणिक उत्क्रांतीतील महत्त्व व मानवी सभ्यतेचे ऐतिहासिक उल्लेख लक्षात घेता भारतीय ज्ञानप्रणाली व तिचे महत्व जाणून घेणे अगत्याचे आहे. मौखिक ज्ञान परंपरा, मानवी संस्कृतीला विविध आयाम प्रदान करणाऱ्या चालीरीती, सण-उत्सव, धार्मिक ग्रंथ, परंपरागत व्यवसाय, प्राचीन तंत्रज्ञान याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांकडे संक्रमित होतांना दिसते. अर्थात भारतीय ज्ञानप्रणालीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. या ज्ञानप्रणालितूनच भारत एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक एकात्मतेच्या बहुसांस्कृतिक धाग्यात जोडला गेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे अधिष्ठान ‌‘भारतीय संस्कृतीत’ आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे.

    – राजेंद्र नन्नवरे
    वन्यजीव अभ्यासक

    175.00
    Add to cart