एकविसावे शतक हे जैवविविधतेचे शतक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य वैविध्यपूर्ण वनसंपदेसाठी प्रसिध्द आहे. परंतु सर्वच वनस्पतींना औषधी मान्यता अभ्यासाशिवाय नसते. त्यात काही विशिष्ट वनस्पतींना अधिकची मान्यता प्राप्त असते. औषधी वनस्पतींची माहिती मराठी भाषेत देताना आजही वैज्ञानिक भाषा वापराच्या मर्यादा अनुभवास येतात.
प्रस्तुत ग्रंथात जवळपास 384 औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आलेली असून वनस्पतींचे शास्त्रीय किंवा लॅटिन नाव, कूळ, शास्त्रीय वर्णन, उपयुक्त भाग, उपयोगिता, रसायने, भौगोलिक प्रसार इ. बाबींवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतील त्यांची नावे इतर भाषिकांना उमज होण्याच्या दृष्टीने दिली आहेत. औषधीय रसायनांचा उल्लेख इंग्रजीत शास्त्रीय भाषेतच संभ्रम टाळण्याच्या हेतूने दिला आहे. सरतेशेवटी परिशिष्ट-1 मध्ये विविध रोग आणि त्यावरील औषधे, तसेच परिशिष्ट-2 मध्ये औषधी गुणांनुसार औषधी वनस्पतींची सूची दिली आहे. शास्त्रीय व इतर भाषेतील नावे वर्गमालेनुसार दिली आहेत.
सामान्य जनास सदरील ग्रंथ उपयुक्त ठरावा हा जरी या ग्रंथाचा प्रमुख हेतू असला तरी विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांनाही त्याचा उपयोग होईलच. पारंपारिक शिक्षणाबरोबर आयुर्वेद, शिक्षण, कृषी, उद्योग व वनविभाग यांनाही हा ग्रंथ संग्रही ठेवता येईल.
Maharashtratil Aushadhi Vanspati Sangrah