राज्यशास्त्र हा विषय जगातील प्राचीनतम विषयापैकी महत्त्वपूर्ण विषय असून मानवाच्या संघटित जीवनास सुरूवात झाल्यानंतर पोषक पार्श्वभूमी निर्माण झाली. अनेक शतकापासून राज्यशास्त्राच्या विकासक्रमात विषयाच्या व्याख्या, व्याप्ती आणि अभ्यासपद्धतीत बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्राच्या अध्ययनात नवनवे प्रवाह आणि अध्ययनपद्धती उदयाला येऊ लागले. नवप्रवाहाचे समर्थन करणाऱ्या राज्यशास्त्रज्ञांनी पारंपरिक राज्यशास्त्राला अशास्त्रीय ठरविले. 1953 साली डेव्हिड ईस्टनने यांनी ‘राजकीय व्यवस्था’ हा ग्रंथ प्रकाशित करून खळबळ उडविली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या राजकीय परिस्थितीत व्यापक फेरबदल झाले. साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा अंत होऊन आशिया व आफ्रिका खंडात अनेक देश स्वतंत्र झाले. या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, नव्याने उदयाला आलेल्या राष्ट्रांतील राजकीय जीवन व समुहांचा अभ्यास करणे गरजे असल्याने राज्यशास्त्राला शास्त्रीय व सर्वसमावेशक स्वरूप देणे आवश्यक झाल्याने त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या.
सदरील पुस्तकात आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या उदयाची कारणमीमांसा, स्वरूप, महत्त्व, इतर ज्ञानशाखांशी असलेला संबंध आणि मर्यादा, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व, राजकीय संसूचन आणि आधुनिक काळात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे.
Adhunik Rajkiya Vishaleshanacha Parichay