• आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत

    आधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.

    आधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.

    Aadhunik Bharatiya Rajkiya Vicharwant

    275.00
    Add to cart
  • आधुनिक राजकीय विचार प्रणाली

    राज्यशास्त्रात राजकीय, सामाजिक विचार प्रणालीची सुरवात हॉब्ज, लॉक, रुसो, नंतर हेगेल, मॅक्स वेबर, बेर्थेम सारख्या विचारवंतानी केली आहे. या विचारसरणीला एक वैचारिक व सोबत नैतिक स्वरुपाचे अधिष्ठान होते. नंतरच्या कालखंडात विचारसरणीतील अतिरेकी भूमिका, हिंसात्मकतेला देण्यात आलेले पाठबळ दुसर्‍याच्या विचारांना तुच्छ लेखने यासारख्या आत्मकेंद्रीत विचारांमुळे विचारसणींना विरोध हेऊ लागला. यामुळे वैचारिक प्रगती ऐवजी वैचारिक संघर्षाचे रुपांतर व्यावहारिक संघर्षात होऊन वैचारिक सहिष्णूता अमान्य करण्यात येऊ लागली. त्यातुनच विचारसरणीवर टीका होऊन तिला नाकारणे यासारखा विचार पुढे येऊन ‘विचारसरणीचा अंत’ यासारखा विचार पुढे आला.

    ‘विचार हा मानवी ठेवा’ असून त्याचा सर्वाधिक प्रभाव हा राज्यशास्त्रावर पडतो. विचारसरणीचे ऐतिहासिक संदर्भ उत्क्रांतत्वानुसार त्यात झालेले बदल, त्यातील विविध प्रवाह व उपप्रवाह, सातत्य वस्तुस्थिती तसेच प्रत्येक विचारसरणीचे महत्त्व तिच्या मर्यादा आणि त्या विचारसरणीवर होणारी टीका या सर्वाच्या अभ्यासासाठी प्रस्तुतचा प्रयत्न यशस्व्ी होईल ही अपेक्षा…

    Aadhunik Rajkiya Vichar Pranali

    450.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    पाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्‍या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.

    Pachimatya Rajkiya Vicharvant

    295.00
    Read more
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pashchimatya Rajkiya Vicharwant

    235.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, लॉक, रुसो, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pachimatya Rajkiya Vicharvant

    275.00
    Add to cart
  • भारतीय राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.

    Bhartiya Rajkiya Vicharvant

    235.00
    Add to cart
  • भारतीय लोकशाही गणराज्य

    Bhartiya Lokshai Gunrajay

    225.00
    Add to cart
  • भारतीय संविधान

    सदरील ग्रंथात भारतीय लोकशाही, भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारतीय लोकशाही गणराज्याची व्यवस्था, त्यातील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, माहितीचा अधिकार, मानव अधिकार, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ तसेच न्यायमंडळाबरोबर भारतातील नागरी सेवा व नागरी सेवेचे महत्त्व, नोकर भरतीची प्रक्रिया व पद्धती तसेच केंद्रीय आणि राज्यसेवा आयोग, कर्मचारी नेमणुकीसाठीचे आयोग, त्याचे कार्य व अधिकार यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.

    संसदीय लोकशाही या सर्वोत्तम शासन प्रकाराचाच आपण स्विकार केला असून तो ‘जीवनमार्ग’ ठरावा म्हणून त्यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत. ह्या दृष्टीने प्रत्येक भारतीय नागरिकास लोकशाहीची मूल्ये, संविधानातील उपाय योजना इत्यादींची माहिती होणे आणि असणे आवश्यक आहे. एकूणच लोकशाही व्यवस्थेस पूरक ठरणार्‍या घटकांची माहिती देण्याचा व त्याद्वारे जनजागृतीला चालना देण्याचा, त्यातून लोकप्रबोधन घडवून आणून आवश्यक समाज परिवर्तन होऊन खर्‍या अर्थाने ‘नागरी समाज’ स्थापन करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करण्यास मदत होईल. म्हणूनच या ग्रंथाचा हेतु चांगला नागरिक घडविणे हा देखील आहे.

    Bharatiya Sanvidhan

    350.00
    Read more
  • महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रमुख संकल्पना

    महात्मा गांधी हे आदर्शवादी व युगप्रवर्तक नेते होते. त्यांनी राजकारणाला व्यावहारीक अशी नवी अधात्मवादी दृष्टी दिली. अन्यायाचा प्रतिकार सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. गांधीजींनी ग्रामपातळीपासून ते देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात, समाजकारणात शुद्धीकरणाला महत्व दिले. त्यांचे सामाजिक कल्याण, अस्पृश्यता व जातीय ऐक्य, महिला सबलीकरण, शिक्षणासंबंधीचे विचार तसेच आर्थिक क्षेत्रात भांडवलवाद व नागरीकरण, आरोग्य आणि स्वच्छता तसेच शेतकरी, कामगार, आदिवासी व अल्पसंख्याकांसंबंधी विचार हे अद्वितीय विचार आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतिप्रवाहाचे कृतिशील विचारवंत व नेते होते. 20व्या शतकातील महान विचारवंत, प्रकांड कायदेपंडित, थोर समाजसेवक, दूरदर्शी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. डॉ. आंबेडकरांचे जीवन-कार्य अलौकिक व अनन्यसाधारण असून, आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. उत्तम प्रशासक, थोर बुद्धिवादी व सिद्ध हस्तलेखक, ग्रंथकार, कुशल संघटक, दलितांचे महान नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच सामाजिक विज्ञानाच्या प्रमुख ज्ञानशाखांतील तत्वचिंतक अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी केलेले समाजकारण, राजकारण, अर्थकारण, राज्यघटना, शिक्षण या विषयावरील मूलगामी चिंतन, विश्लेषण व कार्य भारतीयांना प्रेरक, पूरक व मार्गदर्शक असे आहे.
    महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन महापुरुषांनी आपल्या विचार व कृतीने जनमानसात नवजागृती निर्माण करून समताधिष्ठीत मूल्यांची जपवणूक करून आधुनिक भारताची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

    250.00
    Add to cart
  • महाराष्ट्र प्रशासन

    Maharashtra Prashasan

    195.00
    Add to cart
  • महाराष्ट्राच्या प्रशासनाची ओळख

    महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संयुक्त महाराष्ट्राची एक फलश्रुती आहे. ‘महाराष्ट्र प्रशासन’ या संबंधीचे अध्ययन हे सामाजिक शास्त्रात मूलभूत स्वरूपाचे आहे. ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दाच्या माध्यमातून बहुविध स्वरूपाची चर्चा व तिचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया गतिशील स्वरूपाची आढळते. उपरोक्त विवेचनात महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती प्राप्त होते. प्रत्येक जिल्हा हा अनेक क्षेत्राच्या दृष्टिने उपयुक्त स्वरूपाचा आहे, पर्यावरण, इतिहास, सामाजिक संदर्भ, सहकार, उद्योग, राजकीय पार्श्वभूमी व नेते, वेगळेपण, याबाबत प्रत्येक जिल्ह्यांचे निराळेपणा वा वैशिष्ट्ये आढळतात.

    सदरील पुस्तकात महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ठळक वैशिष्ट्ये, पुनर्रचित प्रशासकिय विभाग आणि जिल्हे, राज्य सचिवालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, ग्रामीण स्थानिक प्रशासन, शहरी स्थानिक प्रशासन – नगरपालिका, महानगरपालिका, इतर शहर स्थानिक संस्थाचे प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, आदिवासी विभाग विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, म. फुले, आण्णासाहेब पाटील, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास महामंडळ, विकेंद्रीकरण वगैरे प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. सदरील पुस्तकातील मांडणी ही स्पष्ट व सुबोध भाषेत करण्यात आली आहे.
    प्रस्तुत पुस्तक नेट-सेट, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षार्थ्यांना तसेच वाचक, अभ्यासू आणि जिज्ञासूंनासुद्धा उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    Maharashtrachya Prashasanachi Olakh

    395.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक चळवळी

    महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू झालेली पहिली सामाजिक चळवळ म्हणून सत्यशोधक चळवळीचा विचार होतो. तत्कालिन समाज व्यवस्थेत ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व खूप वाढले. त्यांनी बहुजन समाजाला रूढी, प्रथा, परंपरा तसेच अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवल्याने सत्यशोधक चळवळीने त्याचा प्रचंड विरोध केला. धार्मिक परंपरावादाला व अंधश्रद्धेला आव्हान देणारी तसेच मुस्लीम समाजात आधुनिक सुधारणावादाचे बिजारोपण करून प्रबोधन घडवून आणण्यात मुस्लीम जगतातील पहिली चळवळ म्हणून मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करावा लागतो. हिची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे 22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लीम युवकांच्या बैठकीत केली. यासोबतच दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आदिवासी चळवळींचा देखील उल्लेख करावा लागेल. क्रांतीकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात भारताच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गती घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याचप्रमाणे बिहार व अन्य राज्यांतही आदिवासी चळवळी अत्यंत तीव्र व व्यापक स्वरूपाच्या होत्या. पण महाराष्ट्रात मात्र तसे आढळून येताना दिसत नाहीत.

    Maharashtratil Rajkiya V Samajik Chalwali

    150.00
    Add to cart
  • मानवाधिकार आणि मूल्यशिक्षण

    Manvadhikar Aani Mulyashikshan

    475.00
    Add to cart
  • राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती

    संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.

    सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.

    सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.

    Rajyashastratil Sanshodhan Paddhati

    110.00
    Add to cart