• आरोग्य भूगोलशास्त्र

    Arogya Bhugolshastra

    225.00
    Add to cart
  • गावांजली

    प्रा. डॉ. ज्ञानेेश्वर शिवाजी सूर्यवंशी (1 जून 1969) मूळचे मुडी प्र डा., ता.अमळनेर, जि.जळगांव, महाराष्ट्र येथील रहिवासी असून सध्या ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात भूगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा 24 वर्षे शिकविण्याचा, 20 वर्षे संशोधनाचा, 17 वर्षे प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी 2002 मध्ये क.ब.चौ.उ.म.वि., जळगांव कडून आदिवासींचे आरोग्य भूगोलशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 पर्यंत ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी डिसेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 पर्यंत ते क.ब.चौ.उ.म.वि., जळगांवच्या आजीवन शिक्षण मंडळाचे संचालक होते. त्यांना भारतीय प्रगत अध्ययन संस्था, शिमला कडून 2009-11 ची शिष्यवृत्ती प्राप्त होती. तसेच भारतीय दूरस्थ संवेदन संस्था, डेहराडून मध्ये 2006 ला त्यांनी प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी 10 संशोधन प्रकल्प विविध संस्थांना सादर केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थीनी पीएच.डी. व एम.फील. पूर्ण केले आहे. लेखन व संपादनात त्यांनी 187 पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ, संपादित पुस्तके व नियतकालिके, पुस्तके, संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. सुमारे 16 पेक्षा अधिक परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळाचे आयोजन त्यांनी केले आहे. द.कोरिया, मलेशिया, श्रीलंका येथील परिषदांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. डॉ. सूर्यवंशी हे क.ब.चौ.उ.म.वि. च्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य (2016-19) होते. तसेच ते भूगोल अभ्यास मंडळ व विज्ञान विद्याशाखा सदस्य म्हणून 10 वर्षे कार्यरत होते. त्यांना दिव्य मराठीचा ‌‘आदर्श शिक्षक’ (2020), क.ब.चौ.उ.म.वि. चा ‌‘उत्कृष्ट प्राचार्य’ (2017), अमेरिकन विज्ञान संस्थेकडून ‌‘प्रवास अनुदान’ (2013), म.भू.प., पुणेचा ‌‘तरुण भूगोलतज्ज्ञ’ (2012), भारतीय सामाजिक संस्था, नवी दिल्ली कडून ‌‘तरुण सामाजिक शास्त्रज्ञ’ (2011), क.ब.चौ.उ.म.वि. कडून उत्कृष्ट ‌‘रासेयो कार्यक्रम अधिकारी’ (2008) यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूगोल संस्थाचे आजीव सभासद असून कार्यकारिणी सदस्य आहेत.शोशत विकास, अधिवासीचे आरोग्य व भूऔषधशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय असून सामाजिक चळवळीत त्यांनी दायित्व दिले आहे. अलीकडे त्यांनी ‌‘काव्यांजली’ व ‌‘निसर्गावली’ हे काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.

    125.00
    Add to cart
  • भू-माहितीशास्त्र

    अलिकडच्या माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. भूगोलशास्त्राच्या सर्वंकष अभ्यासासाठी विस्तृत माहिती व आकडेवारीची गरज असते. अशा आकडेवारीवर संस्कार करून उपलब्ध निष्कर्षाचा भविष्यातील नियोजन व व्यवस्थापनासाठी उपयोग होतो. अशी विस्तृत माहिती अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे भूगोलशास्त्राच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी अतिशय महत्वाची ठरते. बुद्धीवादी मानवाने ज्ञानाच्या जोरावर माहितीवर संस्कार करून, त्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून नवनवीन व उपयुक्त माहितीची भर भूगोलशास्त्रात टाकली आहे. त्या सर्व माहितीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला व्हावा की ज्यातून ‘मानवी कल्याण’ खर्‍या अर्थाने साधता येईल एवढा प्रामाणिक हेतू मानव बाळगून आहे.

    सदरील भू-माहितीशास्त्र या पुस्तकात प्रामुख्याने सुदूर संवेदन, निष्क्रीय संवेदक, हवाई छायाचित्र, सक्रीय दुरस्थ संवेदक, भूप्रतिमाने, भौगोलिक माहिती प्रणाली, संगणक आणि जागतिक स्थान निश्चिती यासारख्या आवश्यक घटकांचा समावेश केल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    Bhu-Mahitishashtra

    150.00
    Add to cart