‘चकवा’ केवळ प्रांतविशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही.
केवळ प्रांतीय आदिमजीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही.
आदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा.
स्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणार्या सेवलीची करूणगंभीर कहाणी म्हणजे चकवा.
विज्ञानयुगाकडे झेपावणार्या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणिवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखविणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबविणारी, सोकॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी आणखी बरेच काही करणारी…
Chakva Eka Akalan