• आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल

    ‌‘आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल’ या ग्रंथात आपत्ती व्यवस्थापनातील संकल्पना, आपत्ती आणि संकट : ओळख, आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना, हवामानविषयक आपत्ती आणि व्यवस्थापन, भूगर्भीय व भूरूपशास्त्रीय आपत्ती आणि व्यवस्थापन, मानवनिर्मित आपत्ती आणि व्यवस्थापन, जागतिक समस्यांचा अभ्यास, आपत्ती घटनांचा अभ्यास या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक सद्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट/सेट परीक्षांनाही उपयोगी ठरेल असा प्रयत्न आहे.

    Appati Vyavsthapancha Bhugol

    245.00
    Add to cart
  • आर्थिक भूगोल

    मानवाच्या आर्थिक क्रिया आणि मानवाच्या सभोवतालची परिस्थिती यांचा सविस्तर अभ्यास आर्थिक भूगोल या शाखेमध्ये केला जातो. मानव हा घटक पर्यावरणाची निर्मिती तर संसाधने ही पर्यावरणाची वैशिष्ठ्ये आहेत. अर्थशास्त्रातील उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण या घटकांवर प्राकृतिक पर्यावरणाचा सतत परिणाम होत असतो. वस्तू उत्पादन, वस्तूंचा उपभोग आणि त्या निर्मित वस्तूंचा विनिमय याबरोबरच आर्थिक-सामाजिक आणि बौद्धिक गरजांच्या पुर्ततेसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा अशा सर्वांचा समावेश मानवी आर्थिक क्रियांमध्ये केला जातो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाचा परिचय, अभ्यास पद्धती, विविध शास्त्रांशी असलेले संबंध, विविध आर्थिक क्रिया, जगातील संसाधने, भारतीय अर्थव्यवस्था, शेती, वाहतूक, व्यापार, उद्योगधंदे, कारखानदारी, प्रादेशिक विकास, ग्रामीण विकास या विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.

    Arthik Bhugol

    325.00
    Add to cart
  • पर्यावरणीय भूगोल

    पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही कालावधीनंतर येथे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. या सजीवांच्या उत्क्रांतीमधूनच मानवाची देखील निर्मिती झाली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, हे घटकांची गरज असून हे घटक सजीवांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरातून मिळतात. पर्यावरण ही संकल्पनाच बहुव्यापक, बहुसमावेशक व बरीच गुंतागुंतीची आहे. पर्यावरण एक किवा अनेक सजीवांचे बनलेले असते. तसेच ते एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेले असते. पर्यावरण ही संकल्पना स्थल व कालसापेक्ष आहे. कारण भूपृष्ठावर सर्वत्र सारखेच पर्यावरण नसते. अलीकडे पर्यावरण ही बहुचर्चित संकल्पना बनली असून ती अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतेचा एक प्रमुख विषय ठरत आहे.
    सदरील पुस्तकात पर्यावरणीय भूगोलाचा परिचय, परिसंस्था, जैवविविधता व तिचे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय समस्या, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे इ. महत्त्वपूर्ण घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Paryavaraniya Bhugol

    325.00
    Add to cart
  • प्राकृतिक व मानवी भूगोल

    प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. या मध्ये प्रामुख्याने शीलावरण, वातावरण, जिवावरण, व जलावरण या प्रमुख बाबींचा समावेश होतो. पृथ्वीचे भुकवच, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या बाहेरील असणारे वातावरण, त्या वातावरणाचे विविध घटक, पृथ्वीवरील वायुभार पट्टे, त्यांचा इतर अनेक घटकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणार्‍या सह संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे महत्व, स्वरूप, व्याप्ती, याशिवाय त्यामध्ये मानवी लोकसंख्या, मानवी वसाहत, शेती इत्यादी मानवी जीवनाशी निगडीत बाबींचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक पर्यावरण, त्या पर्यावरणातील अनेक घटक मानवी जीवनावर परिणाम घडवून आणतात. लोकसंखेच्या बाबत भारतीय लोकसंख्या, तिची रचना, वितरण, त्यावर परिणाम करणारे घटक, जागतिक दृष्टिकोणातून लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, भारतीय लोकसंख्या वाढीचे गुण दोष, तर भारतातील विविध वसाहतींचे प्रकार, आकृतीबंध, नागरीकरण, नागरीकरणाचे स्वरूप, देशात व राज्यातील नागरीकरणाची स्थिति, भारतीय शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती आणि शेतकरी यांच्या समस्या इत्यादी दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

    भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.

    Prakritik V Manavi Bhugol

    225.00
    Add to cart
  • व्यापारी भूगोल

    Vyapari Bhugol

    195.00
    Add to cart