‘संरक्षण अर्थशास्त्र’ राष्ट्रीय विकासाच्या पायातील महत्त्वाचा भाग असून त्याचा संबंध नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनमानाच्या, राहणीमानाच्या स्तराशी आहे. अर्थशास्त्राच्या सर्व योजनामध्ये प्रथमतः संरक्षण खर्चाचा विचार होणे अत्यावश्यक असते. संरक्षण खर्च अनुत्पादीत आहे का आवश्यक आहे. या विचारापलिकडे जावून राष्ट्राची अस्मिता सांभाळणे गरजेचे आहे.
संरक्षण आणि सामरिकशास्त्राच्या अभ्यासकांच्या अत्यावश्यक गरजेतील महत्त्वाची गरज ‘संरक्षणावर होणारा योग्य खर्च’ आहे. भूतकालीन खर्चाच्या आढाव्यातून, अनुभवातून, भविष्यकालीन सुखावह, स्थिर मार्ग निश्चित करता येतो. संरक्षण अर्थशास्त्रावर जी काही माहिती उपलब्ध आहे ती बहुतांशी इंग्रजी भाषेतून असून काही अंशी हिन्दी भाषेतून प्राप्त होते. मराठी भाषेत मात्र या विषयावर सविस्तर लिखाण झालेले नाही. महाराष्ट्रातील अभ्यासकांना मराठा रेजिमेंटच्या शूटशिपाई, अधिकारी आणि योद्ध्यांना संरक्षण अर्थशास्त्राची जाणीव व्हावी, त्याची दिशा निश्चित करता यावी यासाठी या लेखनाचा प्रयत्न झालेला आहे.
Sanrkshan Arthashastra