• आधुनिक भारतीय भाषा : मराठी

    आधुनिक भारतीय भाषा : मराठी

    भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांना माध्यमांची भाषा सांगणं, माध्यम समजावून सांगणं आणि संवादाच्या या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. जग बदलतं त्याच प्रमाणात परस्परसंबंध बदलतात आणि भाषाही बदलत जाते. भाषेच्या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय समज नसेल, तर त्यांना संवादाचे प्रयोजन समजत नाही आणि परिणामही समजत नाहीत.
    हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण, ते विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने आधुनिक करते. नव्या जगाची भाषा शिकवते. व्यवहाराशी नाते जोडत, बदलांना आत्मसात करत पुढे जाण्यासाठी सज्ज करते. हे पुस्तक केवळ नव्या माध्यमविश्वाचे बाह्यरूप सांगत नाही, तर बदलाच्या या प्रक्रियेचे अंतर्बाह्य विश्लेषण करते. विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने आधुनिक करते. म्हणून या अभ्यासक्रमाच्याच नव्हे, तर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण ‘माध्यम’ आणि ‘संज्ञापन’ समजल्याशिवाय बदलणार्‍या जगाचे भान येणार नाही!
    माझे तरूण सन्मित्र डॉ. हरेश शेळके तसेच डॉ. गीतांजली चिने या प्राध्यापकांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे मी त्यामुळेच स्वागत करतो.

    संजय आवटे
    राज्य संपादक, ‘दिव्य मराठी’ 2016 मध्ये भरलेल्या भूतान येथील
    सहावे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

    Adhunik Bhartiya Bhasha : Marathi

    Rs.175.00
    Add to cart
  • आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी : रारंग ढांग

    आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी : रारंग ढांग

    भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्‍यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

    डॉ. पंडित विद्यासागर
    माजी कुलगुरू
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

    Adhunik Sahityaprakar Kadambari – Rarang Dhang

    Rs.175.00
    Add to cart