भारतवर्ष भारतीय संस्कृतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतवर्षाची संकल्पना, वेद उपनिषदे, हिंदू, जैन, बौद्ध साहित्य, भारताची ज्ञानपरंपरा कला आणि संस्कृतीत हडप्पा, सिंधु संस्कृतीमधील स्थापत्यकला, शिल्पकला, मुर्तीकला, चित्रकला तसेच निरनिराळ्या कालावधीमधील कलासंस्कृती विकासाचा समावेश केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत प्राचीन विद्यापीठे, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिचय देऊन भारतीय शिक्षणपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकासातील सर्वधर्मीय विचार, विस्तार, जनपद, ग्रामस्वराज्याबद्दल माहितीचे संकलन केलेले आहे. प्राचीन भारतातील विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्राची माहिती देताना पर्यावरण जाणीव जागृती, आयुर्वेद, योग विपश्यना आणि निसर्गोपचारांची ओळख करून दिलेली आहे. भारतीय आर्थिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र विकासात भारतीय व्यवसाय, उद्योग समुद्री व्यापार तसेच अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा समावेश केलेला आहे.
Bhartach Shoda