शिक्षणाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. शिक्षण प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती यांच्यात प्रगती करणे, सुधारणा करणे, समस्या सोडविणे ही शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. मानसशास्त्र हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. त्यातील सिद्धांत, तत्त्वे, उपपत्ती म्हणजे शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ संशोधनाचे फलित आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार मानवात व्यक्तिभिन्नता असते. शरीरयष्टी, रंग, उंची, वजन, स्वभाव वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती, अभियोग्यता, बुद्धिमत्ता अशा अनंत बाबतीत कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिविकासाच्या विशिष्ट अवस्था मानल्या आहेत.
या पुस्तकाची व्याप्ती, सखोलता आणि वेगळेपणा विचारात घेतल्यास प्रस्तुत पुस्तक केवळ बी.एड्., एम.एड्., एम.फिल. साठीच उपयुक्त नाही तर नेट, सेट व शिक्षण क्षेत्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
Pragat Shaikshanik Manasshastra