मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.
Samakalin Yuddhapaddhati